वारकऱ्यांची यंदा होणार सोय;आषाढी वारीसाठी एसटीच्या जिल्ह्यातून १८० जादा बसेस-विभाग नियञंक अजयकुमार मोरे
प्रत्येक आगारातून जादा बसेसचे नियोजन
क्लिक2आष्टी अपडेट-आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची सोय व्हावी. यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बीड विभागातून १८० जादा बसेसची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती विभागीय नियंत्रक अजयकुमार मोरे यांनी दिली.दरम्यान, ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना असलेला मोफत प्रवास व महिलांना तिकिटातील अर्धी सूट यामुळे यंदा वारीसाठी एसटीला गर्दी वाढण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे.

पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी लाखो भाविक पायी चालत विठ्ठलभेटीसाठी जातात.मात्र,ज्यांना पायी चालता येणे शक्य होत नाही,वेळेचा अभाव,आजापरण व इतर कारणांमुळे वारी चुकेल,अशी शंका असे भाविक एसटीने पंढरपूरला वारीसाठी जात असतात.एसटी प्रशासनाकडून या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी यात्रा काळात ज्यादा बसेस सोडल्या जातात.यंदा तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना शासनाने प्रवास मोफत केला आहे तर महिलांना बस प्रवासातील तिकिटात ५० टक्के सूट दिली आहे.त्यामुळे वारीसाठी एसटीने जाणाऱ्या भाविकांची मोठी सोय होणार आहे.बीड विभागाने १८० जादा बसेसचे नियोजन केले आहे.यामध्ये बीड आगारातून ३०,परळी आगारातून २५, धारूर आगारातून २०,माजलगाव आगारातून २०, गेवराई आगारातून २०, पाटोदा आगारातून २०,आष्टी आगारातून २० आणि अंबाजोगाई आगारातून २५ जादा बसेस २४ जून ते ४ जुलै या काळात सोडल्या जाणार आहेत. २९ जून हा आषाढी वारीचा मुख्य दिवस आहे, तर ३ जुलै ही पौर्णिमा असल्याने या दिवशी काला होऊन यात्रा समाप्त होत असते.मागीलवर्षी २०२२ साली १५० बसेसमधून ८९ हजार प्रवाशांनी प्रवास केला.अशी माहिती विभाग नियञंक अजयकुमार मोरे यांनी दिली आहे.