सार्वजनिक बांधकाम उपअभियंता सानपचा अजब फतवा;आमदारांच्या पञाचे मला घेणे-देणे नाही
क्लिक2आष्टी अपडेट-आष्टी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शिवाजी सानप ह्यांनी अजब फतवा काढत आपला कारभार बीडच्या बियरबार मध्ये बसून,आपल्या मर्जीतील गुत्तेदारांना कामाचे अंदाज पञक बनवून काम देण्या आगोदरच हजारो रूपायांची मागणी करत आष्टीमध्ये काम करायचे असेल दोन्ही आमदारांच्या पञाचे मला काहि घेणे-देणे नाही असे म्हणत मला खुष केले तरच तुला काम भेटेन असा अजबच फतवा काढला आहे.
याबाबत अधिक अशी की,गेल्या वर्षभरापासून आष्टी येथील सार्वजनिच बांधकाम विभागाचा पदभार शिवाजी सानप यांनी घेतला खरा आपला कारभार हे बीडहूनच हाकीत आहेत.आष्टी-डोईठाण रस्ताचे काम हे निकृष्ठ दर्जाचे असून,याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या पण सानप यांना या कामावर भेट देण्यासही वेळ मिळत नसून,ते गुत्तेदारांशी संपर्क साधून आपले काम करून घेतात.तसेच कोणत्याही नेत्याला तुम्ही कोणत्याही कार्यालयाचे पञ आणा मी लगेच अंदाज पञकावर सह्या देतो असे म्हणत आणि मी काम देतांना आ.धस,आ.आजबे यांच्या पञाला महत्व देत नसून,मी जे ठरवतो त्यालाच काम देतो असे म्हणत गुत्तेदारांनी बनविलेल्या अंदाज पञकावर बीडमधील बार मध्ये बसून सह्या करून देत आपण फक्त एवढं बील द्या तुमचं काम झालचं समजा असा अजबच फतवा या सानप यांनी काढला आहे.
महिन्यातून एकदाच आष्टीत
आष्टी येथील सानप यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचा पदभार घेतल्यापासून ते वर्षभरात फक्त बारा वेळेसच कार्यालयात हजर राहिले आहेत.बाकी सर्व कारभार बीडमधील बियर बार मधूनच हाकतात.
वरिष्ठांनी लक्ष घालावे
अशा हप्तेखोर अधिका-याला लगाम घालण्यासाठी जिल्हा कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग बीड क्र-२ यांनी लक्ष घालून या असल्या बेजबाबदार अधिकारी असलेल्या उपअभियंतावर कारवाई करावी अशी मागणी तालुक्यातून होत आहे.