व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जीवन राष्ट्र समर्पित मा.मुख्यमंत्री तीर्थसिंह रावत

0

क्लिक2आष्टी अपडेट-भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या असामान्य नेतृत्वाचा जगभरात डंका वाजत असून त्यांनी आपल्या प्रखर राष्ट्रभक्तीतून गोरगरीब जनतेसाठी अखंड परिश्रम घेऊन आपले संपूर्ण जीवन राष्ट्राला समर्पित केलेले आहे.त्यांनी सततच्या राष्ट्र चिंतनातून गोरगरीब जनता महिला आणि युवक यांच्यासाठी अनेक प्रभावशाली योजना राबवले असल्याने या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेमध्ये पोहोचवण्याचे काम युवक कार्यकर्त्यांनी करावे असे आवाहन उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार तीर्थ सिंह रावत यांनी केले.आष्टी येथील आमदार सुरेश धस यांनी आयोजित केलेल्या भारतीय जनता पार्टीच्या युवक आणि बुद्धिवंत यांच्या मेळाव्यामध्ये प्रमुख मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर भाजपा प्रदेश सरचिटणीस किरण पाटील या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन आ.सुरेश धस यांनी आष्टी येथील मोरेश्वर मंगल कार्यालय येथे केले होते.यावेळी भाजपा आष्टी तालुका अध्यक्ष साहेबराव म्हस्के,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ कार्यकर्ते श्रीधरपंत सहस्त्रबुद्धे, बीड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला,आदिनाथ सानप,महेंद्र गर्जे,संजय आजबे,जयदत्त धस,सागर धस उपस्थित हे होते
खा.तीर्थ सिंह रावत पुढे म्हणाले की,140 कोटी जनतेच्या कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेतृत्वाची भारत देशाला गरजअसून गेल्या नऊ वर्षापासून पंतप्रधान मोदींनी एक दिवसही स्वतःच्या खासगी कामासाठी सुट्टी घेतलेली नाही किंवा एक दिवस ते आजारी असल्याने त्यांनी कामाला सुट्टी दिली असे आजवर घडलेले नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रखर राष्ट्रभक्ती आणि राष्ट्राविषयी असलेले चिंतन यामुळे त्यांनी जगभरामध्ये आपली प्रतिमा सिद्ध केली असून यापूर्वी भारत देशातील कोणत्याही नेत्यांना मिळालेल्या प्रसिद्धीपेक्षा कित्येकपट प्रसिद्धी त्यांना जगभरात मिळत असून त्यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले आहे भारत देशातील विरोधी पक्ष मात्र घोटाळेबाज असून त्यांनी भ्रष्टाचार करून देशाला लुटण्याचे काम केले आहे असे राजकीय पक्ष स्वतःचे कुटुंब हीच राजकीय पार्टी समजून आपापला स्वार्थ साधत असून पंतप्रधान नरेंद्र मोदीविरुद्ध एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत काँग्रेसच्या राजवटीमध्ये जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या विरुद्ध लष्कराला किंवा पोलिसांना वरिष्ठांचा आदेश असल्याशिवाय काहीही करता येत नव्हते त्यामुळे सैन्य दलाला आणि पोलिस दलाला आपले स्वतःचे संरक्षण करता येत नव्हते मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत तात्काळ आदेश देऊन लष्कराला आणि पोलिसांना मुक्तहस्ते दहशतवादांना ठोकण्याचे आदेश दिल्यामुळे दहशतवाद संपुष्टात आला असून पुलवामा हल्ल्यानंतर काही दिवसातच भारतीय लष्कराने एयर स्ट्राइक करून अनेक दहशतवाद्यांना दुसऱ्या देशात घुसून कंठस्नान घालून यशस्वीरित्या माघारी परतण्याचा पराक्रम केलेला आहे गेले कित्येक वर्ष आपल्या गुलामगिरीचे प्रतीक असलेल्या राम जन्मभूमी मुक्तीचे काम नरेंद्र मोदी यांनी केले असून आता त्या ठिकाणी भव्य दिव्य राम मंदिराची उभारणी सुरू आहे कोविडच्या काळामध्ये देखील सर्व जग ठप्प असतान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देशातील जनतेच्या घराघरात रेशन पोचवून मोठे काम केलेले आहे उद्योगधंदे बंद असल्याने आर्थिक नुकसान होऊन देखील भारत देशाची अर्थव्यवस्था आज वेगाने प्रगती करत आहे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने समाजासाठी काहीतरी करण्याची उर्मी बाळगावी सर्वसामान्य जनतेची काळजी आणि चिंता करावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारत देश हेच कुटुंब असल्यामुळे त्यांनी त्यांच्या मातोश्रींच्या निधनानंतर दुःखवटा न पाळता, जास्त काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आणि ते करून दाखवले आहे.आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये देखील भारतीय जनता पार्टी प्रचंड यश मिळवून नरेंद्र मोदी हेच पुन्हा एकदा पंतप्रधान होतील यासाठी भारतीय जनता पार्टीचे काम जनतेच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम युवकांना करावे लागणार आहे असे त्यांनी शेवटी सांगितले.यावेळी बोलताना आमदार सुरेश धस यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपर्क अभियान हर घर चलो या बाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन करून “सरल ॲप” वर सहभागी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मतदारांना आवाहन करून युवक कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त मतदारांना सहभागी करून घेण्याचे आवाहन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षातील कामांबाबत जनतेला माहिती देण्यासाठी घरोघर जाऊन सरल ॲप वर माहिती भरण्याचे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या कांदा अनुदानाबाबत आष्टी तालुक्यामध्ये 21 कोटी 50 लाख रुपये अनुदान प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले तसेच युवक कार्यकर्त्यांनी केवळ गुत्तेदारीच्या मागे न लागता शासनाच्या योजना असलेल्या स्व निधी योजना मुद्रा योजना स्टार्ट अप इंडिया या योजनेचा लाभ घेऊन स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करावे केवळ नोकरीच्या मागे न लागता आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी शेवटी केले यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव किरण पाटील म्हणाले की नेता कसा असावा याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे सुरेश धस असून त्यांचे नियोजन बद्धकाम आणि जे ठरवतील ते शंभर टक्के पूर्ण करण्याचे कसब आणि सर्वसामान्य जनतेची जुळलेली नाळ यामुळे ते राजकारणामध्ये यशस्वी झाले आहेत असे त्यांनी सांगितले आष्टीतील भारतीय जनता पार्टीच्या या संपर्क अभियानामध्ये आष्टी पाटोदा आणि शिरूर कासार या विधानसभा क्षेत्रामध्ये अत्यंत प्रभावी रीतीने काम केल्याचे त्यांनी सांगितले यावेळी भारतीय जनता पार्टीचे आष्टी तालुका अध्यक्ष साहेबराव म्हस्के,युवा नेते सागर धस,माजी पं.स.सदस्य आदिनाथ सानप,महेंद्र गर्जे आदींची समयोचित भाषणे झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.