व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

स्वत;च्या बायकोवर नव-यानेच लावला आत्याचार कारयला

बीड जिल्ह्यातील माजलगांव तालुक्यातील घटना

0

बीड-बायकोसोबत एका व्यक्तीला तिच्या इच्छेला न जुमानता शारीरिक संबंध करायला लावल्याची घटना २६ जुलै २०२२ रोजी घडली होती.दरम्यान,पीडित पत्नीच्या फिर्यादीवरून २ नोव्हेंबर रोजी माजलगांव ग्रामीण पोलीस ठाण्यात पतीसह त्या नराधम व्यक्तीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,दि.२६ जुलै २०२२ रोजी माजलगाव तालुक्यातील एका ठिकाणी एका विवाहित महिलेच्या घरात बाशेद इनामदार नावाची व्यक्ती घुसली.त्या महिलेसोबत शरीरसंबंध प्रस्थापित करण्याची मागणी करू लागला.हा सर्व प्रकार महिलेच्या नव-यासमोर घडत होता.दरम्यान,महिला आरडाओरड करू लागली.त्यावेळी बाशेद इनामदार याने आरडाओरड केलीस तर तुझ्या मुलांना जिवंत मारून टाकेन,अशी धमकी दिली व महिलेवर अत्याचार केला.हा प्रकार अनेक दिवसा घडत होता.हा प्रकार घडत असतानाच्या दरम्यान विवाहितेचा नवरा हा घरातून निघून जात असे.बाशेद इनामदार हा पीडित महिलेच्या मनाविरुद्ध तिच्यावर राजरोस अत्याचार करत असे.दरम्यान,पीडित महिलेने या अन्यायाविरुद्ध ग्रामीण पोलीस स्टेशन गाठत २ नोव्हेंबर रोजी वाचा फोडली.पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी बाशेद इनामदार, पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान,प्रकरणातील दोन्ही आरोपी फरार आहेत.तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील बोडखे करत आहेत.घटनास्थळी उपविभागीय अधिकारी धीरजकुमार बच्चू यांनी भेट दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.