खा.राहूल गांधी यांच्यासह तिघांवर भारत जोडो याञे दरम्यान गुन्हा दाखल
बंगळूर वृत्तसेवा-खा.राहुल गांधी यांच्या विरोधात कॉपीराइट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.KGF-2 ची म्युझिक लेबल कंपनी MTR ने ही केस केली आहे.भारत जोडो यात्रेच्या प्रमोशनमध्ये राहुल यांनी KGF-2 चे गाणे वापरले आहे.”समुंदर में लहर उठी है,ज़िद्दी ज़िद्दी है तूफ़ान चट्टानें भी काँप रही है,ज़िद्दी ज़िद्दी है तूफ़ान …”हे गाणे वापरले असल्याचा कंपनीचा आरोप आहे.त्यासाठी त्यांच्याकडून परवानगी घेण्यात आलेली नाही.
म्युझिक कंपनी MTR यांचे म्हणणे आहे की, KGF 2 च्या हिंदी आवृत्तीचे हक्क मिळवण्यासाठी कंपनीने निर्मात्यांना मोठी रक्कम दिली होती. परंतु काँग्रेसने राजकीय अजेंडा आणि मार्केटिंगच्या उद्देशाने कोणताही परवाना न घेता भारत जोडो यात्रा मोहिमेत साउंडट्रॅकचा वापर केला.राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या तेलंगणामध्ये आहे. यात्रेदरम्यान,कलाकार देखील त्यांच्या संस्कृतीचे प्रदर्शन करत आहेत, त्यापैकी एक म्हणजे धिंसा लोकनृत्य.राहुल गांधी यांनी कलाकारांसोबत नृत्य सादर केले होते.राहुल गांधीसह काँग्रेसच्या दोन नेत्यांवर गुन्हा एमटीआर म्युझिकचे व्यावसायिक भागीदार एम नवीन कुमार यांच्या तक्रारीवरून बंगळुरूच्या यशवंतपूर पोलिस ठाण्यात राहुल गांधी,राज्यसभा खासदार जयराम रमेश आणि काँग्रेसच्या सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या अध्यक्षा सुप्रिया श्रीनेट यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.