व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

अजित दादांनी विकास कामांचा शब्द दिल्यामुळेच,सत्तेत सहभागी झालो-आ.बाळासाहेब आजबे

0

क्लिक2आष्टी अपडेट-आष्टी मतदार संघाचा गेल्या तीन वर्षात कोव्हीड,सरकार बदलामुळे पाहिजे तेवढा विकास करता आला नाही.परंतु हे रखडलेले विकास कामे मार्गी लाऊन तालुका सुजालाम सुफलाम करण्यासाठीच,दादांकडून विकास कामांना भरपूर निधी देण्याच्या शब्दावरच आपण उपमुख्यमंञी अजित दादा पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रतिपादन आ.बाळासाहेब आजबे यांनी केले.

आष्टी तालुक्यातील जिल्हा सरहद्द लोणी-धानोरा-वृध्देश्वर रस्ता प्रजिमा १ ते १२ कि.मी.अंतराचा रस्ता सुधारणा करण्यासाठी ४ कोटी ७५ लाख अदांजित किमंतीचा रस्ता उद्याटन शुभारंभ आ.बाळासाहेब आजबे यांच्याहस्ते करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.यावेळी पंचायत समिती सदस्य परमेश्वर काका शेळके,युवानेते सागर दरेकर,युवानेते धैर्यशिल थोरवे,माजी सभापती संतोष गुंड,काकासाहेब शिंदे,युवानेते महेश आजबे,सार्वजनिक बांधकामचे अभियंता प्रदिप बादाडे,राष्ट्रवादी युवक काॅग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब घुले,भवर गुरूजी,सुभाष वाळके,अर्जुन काकडे यांच्यासह आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.पुढे बोलतांना आ.आजबे म्हणाले,ब-याच दिवसापासून ह्या रस्त्याच्या प्रश्न होता.तो आता मार्गी लागणार आहे.हा रस्ता दर्जेदार व्हावा म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी लक्ष घालून दर्जेदार करावा यासाठी लक्ष द्यावे अशा सुचनाही देत.शेतक-यांनी रस्ताकामे सुरू होण्यापुर्वीच पाईप टाकून घ्यावेत म्हणजे रस्ता खराब होणार नाही.शेतक-यांनीही सहकार्य करण्याचे गरज असल्याचेही आ.आजबे यांनी सागितले.

या गावासाठी मी येथील सभामंडपासाठी १० लक्ष देत असून,मतदार संघातील ७० गावात आपण सभामंडप करणार असल्याची घोषणा आमदार आजबे यांनी केली आहे.मी जे काम करतोय ते उपकार करत नाही पण हे प्रश्न मार्गी लावण्याचे माझे कर्तव्यचं आहे.आपला एकच मिशन आहे की,तालुक्याला पाणी मिळणे गरजेचे आहे.हे खुंटेफळ साठवण प्रकल्प करण्यासाठी माझ्या एकटाचे श्रेय नसून,यासाठी आ.सुरेश धस,माजी आ.भिमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर यांचे सुध्दा कार्य यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे.त्यावेळेस निघालेले शिंम्पोरा ते खुंटेफळ पाउपलाईनची काम स्थगीती नसती तर आत्ता पर्यंत ब-या पैकी काम मार्गी लागले असते.पण आता पुन्हा त्यामध्ये बी१ टेंडर निघून लवकरात लवकर काम मार्गी लावण्यासाठी आम्ही दोघे मिळवून प्रयत्न करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही आ.आजबे यांनी सांगीतले.युवानेते धैर्यशिल थोरवे म्हणाले,गेल्या वर्षीच हा रस्ता मंजूर झाला होता.पण सरकार बदलल्यामुळे हा रस्ता प्रलंबित राहिला आता हा रस्ता मार्गी लावला आहे.आता या रस्ताच्या बाजूने वृक्ष लागवड उपक्रम हाती घेऊ आपल्याला जो पाऊस कमी प्रमाणात पडत आहे.त्यामुळे वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घ्यावा असेही थोरवे यांनी सांगीतले.सागर दरेकर म्हणाले,गेल्या अनेक वर्षापासून रस्ताचा प्रश्न प्रलंबित होता.या रस्तासाठी आमदार बाळासाहेब आजबे यांनी लक्ष घातल्याने आता हा मार्गी लागणार आहे.या रस्तासह सुंबेवाडी,काकडवाडी ह्याही रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणीही दरेकर यांनी केली.राजेंद्र दहातोंडे,संजय धायगुडे सुरूवातीला कार्यक्रमाचे प्रस्ताविक बाबासाहेब भिटे यांनी केले.या कार्यक्रमाचे सुञसंचालन सुभाष वाळके यांनी करून आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.