आ.धस अक्रमक;विधान भवनात आम्ही काय?गोट्या खेळायला येतोत काय?
मराठवाड्याच्या प्रश्नावर बोलणारा एकमेव नेता
क्लिक2आष्टी अपडेट-सध्या विधान परिषद व विधान सभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे.या विधान परिषद सभागृहात आज दि.२५ रोजी कामकाज सुरू असतांना अनेक अधिकारी आणि मंञी गैरहजर असतांना आ.सुरेश धस बोलतांना सुरूवातीपासूनच अक्रमक होत आणि अधिकारी मंञी जर सभागृहात येत नसतील तर आम्ही काय? गोट्या खेळायला येतोत का?असा थेट सवाल सभागृहाच्या सभापतींना विचारताच सभापतींनी मंञी येत असल्याचे सांगून वेळ मारून नेहली.

गेल्या आठ दिवसापासून राज्याचे मुंबई येथे पावसाळी अधिवेशन सुरू आहे.या अधिवेशनात मसाठवाड्यातील विविध प्रश्नावर आमदार सुरेश धस सत्तेत असून सुध्दा या भागातील प्रश्न पोटतिडकीने आणि अक्रमकपणे मांडत आहेत.त्याचे व्हिडीओ सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्हायरल होतांना दिसून येत आहेत.आमदार सुरेश धस यांनी अधिवेशात प्रत्येकवर्षी मंञिमंडळाची बैठक मराठवाड्याच्या प्रश्नासाठी कॅबिनेट बैठक छञपती संभाजी नगरला घ्यावी हा मुद्दा लावून धरला आहे.तसेच मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्येचे सञ सुरू आहे.यावर उपाययोजना सरकारने करावी अशी अग्रणही मागणी आमदार धस यांनी केली आहे.मंगळवार दि.२५ रोजी विधीमंडळ कामकाजात विधानपरिषदमध्ये सकाळच्या सञात सुरूवातीपासूनच आमदार धसांनी जोरदार बॅटींग करत सभागृहाचे लक्ष वेधले आहे.आमदार धस यांचे सभागृहात बोलतांनाचे व्हिडीओ वेगवेगळ्या मुद्द्याचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.त्यामुळे त्याची चर्चाही जोरदार होत आहे.