आष्टी येथे जिल्हा रूग्णालय तात्काळ मंजूरी द्या आमदार बाळासाहेब आजबे यांची विधानसभेत मागणी

क्लिक2आष्टी अपडेट-गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित असलेला उपजिल्हा रूग्णालयाचा प्रस्तावाचे गांभिर्य लक्षात घेऊन,आष्टीचे रूग्णालय मुख्य असून,येथे येणा-या रूग्णांची संख्या जास्त आहे.गंभीर रूग्णांना जर पुढील उपचारासाठी पाठवयाचे असेल अहमनगर ला जाण्यासाठी ६० कि.मी.व बीड ला जाण्यासाठी १०० कि.मी.चे अंतर पार करावे लागते.त्यामुळे उपजिल्हा रूग्णालयासाठी दाखल केलेल्या प्रस्तावावरील स्थगीती उठवून हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी आ.बाळासाहेब आजबे यांनी विधानसभेत केली आहे.
विधानसभेतील अधिवेशनात मंगळवार दि.२५ रोजी पुरवणी मागणीत आ.बाळासाहेब आजबे बोलत होते.पुढे बोलतांना आ.आजबे म्हणाले,आष्टी मतदार गेल्या तीन वर्षापुर्वी आष्टी येथील ग्रामीण रूग्णालयाच्या ऐवजी उपजिल्हा रूग्णालय करण्यात यावा असा प्रस्ताव दाखल केला.परंतु त्यावर स्थगिती देण्यात आली आहे.या रूग्णालयात जर गंभीर रूग्ण दाखल झाला तर त्याला पुढील उपचारासाठी नगर किंवा बीड ला पाठवावे लागते.या दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी दिड-दोन तासाचा अवधी लागतो.त्यामुळे येथील परिस्थितीचा आढावा घेऊन या रूग्णालयास उपजिल्हा रूग्णालय करण्यास परावानगी द्यावी.तसेच सार्वजनिक आरोग्य विभागा सुलेमान देवळा,बीडसांगवी,दौलावडगांव असे तीन प्राथामिक आरोग्य केंद्र मंजूर असून त्यांचेही कामे अजून सुरू झाले नाहीत.तसेच पाटोदा तालुक्यातील येथील वाहली येथील आरोग्य केंद्राची इमारतीची दुरावस्था झाली असल्याने नविन इमारत होणे गरजेचे असल्याचेही आ.आजबे यांनी सांगीतले.
ग्रामपंचायतला विचारात न घेता अंदाज पञक
सध्या जलजिवन कामे सुरू असून,मतदार संघातील ब-याच ग्रामपंचायतला विचारत न घेता अंदाजपञक दाखल केले आहेत.तसेच या जलजीवन मधून बरेच गावे वंचीत राहणार आहेत.कारण नसतानाही बरील लांबून पाईपलाईन फिरवली असल्याचेही आ.आजबे यांनी सांगीतीले.