पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील जुन्या कोल्हापुरी बंधाऱ्यांचे रूपांतर लातूर टाईप बॅरेज मध्ये करण्याची मागणी आ.धस यांची माहिती
क्लिक2आष्टी अपडेट-आष्टी तालुक्यातील सीना नदीवरील जुन्या कोल्हापूर पद्धतीचे बंधाऱ्यांचे रूपांतर ज्याप्रमाणे लातूर टाईप बॅरेज मध्ये करण्यात येणार आहे.त्याच पद्धतीने पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील जुन्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यांचे रूपांतर लातूर टाईप बॅरेज मध्ये करण्यात यावे.अशी मागणी आपण उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याची माहिती आ.सुरेश धस यांनी दिली.

याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले की,पाटोदा तालुक्यातील मांजरा नदीवरील पाटोदा येथील रेणुका मंदिर,मुळे वस्ती,नफरवाडी,
पारगाव घुमरा आणि अनपटवाडी येथील को.प.बंधारा हे चार बंधारे तसेच शिरूर (कासार ) तालुक्यातील सिंदफणा नदीवरील शिरूर (कासार),ब्रह्मनाथ येळंब,निमगाव मायंबा येथील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे २५ ते ३० वर्षांपूर्वीचे बांधकाम केलेले आहेत.सद्यस्थितीत ते पूर्णपणे निकामी झालेले असून या बंधाऱ्यांचे गेट देखील बसत नाहीत.त्यामुळे गळती होऊन पाणी अडत नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा काही लाभ होत नाही.त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळावा यासाठी या पाटोदा तालुक्यातील चार आणि शिरूर कासार तालुक्यातील तीन ही कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे रूपांतर लातूर टाईप बॅरेज मध्ये केल्यास पाण्याची साठवण होऊन शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध होऊ शकेल.त्यामुळे याबाबत उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण मागणी केली असून लवकरच दोन्ही तालुक्यातील जुन्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यांचे रूपांतर लातूर टाईप बॅरेज मध्ये होईल.या दोन्ही दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल यासाठी कार्यवाही बाबत चे आश्वासन व उपमुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.