किन्ही ग्रामपंचायतला लोकशाहिर आण्णाभाऊ साठे जंयतीचा विसर;ग्रामपंचायतच्या विरोधात ग्रामस्थांची तक्रार
किन्ही ग्रामस्थांची संबंधितावर कारवाई करण्याची मागणी
क्लिक2आष्टी अपडेट-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची सार्वजनिक जयंती सर्व महाराष्ट्रभर साजरी केली असताना आष्टी तालुक्यातील किन्ही येथील ग्रामपंचायत कार्यालयात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्याचा विसर पडल्याची तक्रार ग्रामस्थांच्यावतीने निवेदनाद्वारे आष्टीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.या निवेदनाद्वारे ग्रामसेवक यांच्यासह संबंधितावर कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

या निवेदनाद्वारे असे म्हंटले,आम्ही किन्ही ग्रामपंचायत अंतर्गत राहणारे नागरिक असून आमच्या गावात ज्येष्ठ समाजसुधारक व साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती दि.०१ ऑगस्ट रोजी किन्ही ग्रा.प.मध्ये साजरी करण्यासाठी सकाळी गेलो असताना ग्रामपंचायत बंद आढळून आले.ग्रामपंचायत सदस्य व आम्ही त्याठिकाणी दोन ते तीन तास थांबलो. परंतु तेथे कोणीही नसल्याने आम्ही ग्रामसेवक म्हेत्रे एस.एम. यांना फोन केला असताना त्यांनी सांगितले कि मी किन्ही येथे येणार नाही.तुम्ही परत जा असे उत्तर मिळाले व संपूर्ण दिवस तेथे कोणीही आले नाही.आम्ही सर्वजण जयंतीसाठी आलो होतोत परंतु जयंती साजरी केली नाही. त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत.त्या कारणाने आम्ही दोषींवर कार्यवाही करण्यासाठी व या पुढे अशा प्रकारच्या समाजसुधारकांचा महान नेत्यांचा अवमान होणार नाही यासाठी सरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी या दोषींवरती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थाची केली आहे.या निवेदनाच्या
प्रतिलीपी अप्पर विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर,जिल्हाधिकारी कार्यालय बीड,मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. बीड,
तहसिल कार्यालय आष्टी,अजिंक्य चांदणे DPI प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांना दिल्या असून या निवेदनावर दीपक मच्छिंद्र भोसले,जयदीप बबन घाडगे,संतोष कोंडीबा भोसले,निलेश कोंडीबा भोसले,विनोद बबन घाडगे,अमोल भाऊसाहेब काकडे,रामचंद्र भाऊसाहेब काकडे,ग्रामपंचायत सदस्य लहू एकनाथ पालवे, युवराज विठ्ठल पालवे,आशाबाई पोपट काकडे,शाहुल काकडे,किशोर मारुती फुलमाळी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.