व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

भारतीय जनता पार्टीच्या ‘सरल अ‍ॅप’ प्रभारीपदी आ.सुरेश धस यांची निवड

प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्ती केली जाहिर

0

क्लिक2आष्टी अपडेट-पक्ष संघटना खऱ्या अर्थाने मजबूत व्हावी म्हणून ‘सरल अ‍ॅप’चे माध्यम भाजपाने स्वीकारले आहे.यात नेमकी भरावी लागणारी माहिती अडचणींची ठरत असतांना महाराष्ट्रात ग्रामिण भागात बीड जिल्ह्यातील आष्टी मतदार संघात आमदार सुरेश यांनी
बूथ पातळीवर हे काम जोमात केल्याची पक्षाने दखल घेत आमदार सुरेश धस यांची महाराष्ट्र राज्य ‘सरल अ‍ॅप’च्या प्रदेश प्रभारी निवड केल्याची खुद्द भाजपाचे प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच ट्विट करून नियुक्ती पञच पोस्ट केले आहे.


भाजपाने पक्ष संघटना मजबूत व्हावी म्हणून सध्याच्या सोशल मिडीयाचा फायदा घेत मतदार संघातील प्रत्येक बुथ निहाय ‘सरल अ‍ॅप’ च्या माध्यमातून पक्ष संघटना मजबूतीचे काम हाती घेतले आहे.गेल्या दोन महिन्यात काम हाती घेत.आमदार सुरेश धस यांनी आष्टी मतदार संघात ह्या ‘सरल अ‍ॅप’ च्या माध्यमातून राज्यात सार्वाधिक काम करत ग्रामिण भाग असूनही शहरी भागाला मागे टाकल्याने या कामाची दखल भाजपा प्रदेश समितीने घेत खुद्द महाराष्ट्राचे प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार सुरेश धस यांची भारतीय जनता पार्टी,महाराष्ट्र प्रदेश “प्रदेश प्रभारी ‘सरल अ‍ॅप’ नोंदणी घोषणा करण्यात आली असल्याचे ट्विट करून पञ सोशल मिडीयावर प्रसिध्द केले आहे.त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे राबविणार-आ.धस
एका बुथवर एकतीस कार्यकर्त्यांची माहिती द्यावी लागते.पंधरा मुद्दे ‘सरल’वर भरावे लागतात.कार्यकर्त्यांचे महाविद्यालय,शाळा,व्यवसाय, कुटुंब सदस्य व अन्य स्वरुपातील ही माहिती बूथ प्रमुखास भरून द्यावी लागत आहे.घरबसल्या आहे ती माहिती भरून टाकण्याचा सोपस्कार चालत नाहीच.कारण अर्धवट माहिती दिल्यास ‘सरल’ ते स्वीकारतच नाही.त्यात बराच वेळ जातो. त्यामुळे ही ‘सरल’ प्रक्रिया किचकट ठरत असली तरी ग्रामिण भागात याची माहिती बुध प्रमखाने कष्ट घेऊन यशस्वी पणे राबवली यश मिळाले आहे.आता पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या राबविणार असल्याचेही आ.सुरेश धस यांनी सांगीतले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.