जेष्ठ विचारवंत लेखक प्रा.हारी नरके यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन
क्लिक2आष्टी अपडेट-ज्येष्ठ विचारवंत, लेखक हरी नरके यांचे निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांनी मुंबईत एशियन हार्ट रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. समता परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे.
हरी रामचंद्र नरके असे त्यांचे पूर्ण नाव असून एक मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर अशी त्यांची ओळख होती. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य देखील होते. हा आयोग महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग या गटात एखाद्या जातीचा समावेश करण्यासाठी किंवा त्या वर्ग-प्रवर्गातून एखादी जात वगळण्यासाठी आलेल्या मागण्या आणि तक्रारीची तपासणी, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून उरलेल्या अन्य मागासवर्गीयांच्या यादीमध्ये,सामाजिक,आर्थिक निकषानुसार प्रगत व उन्नत गट किंवा व्यक्ती निर्धारित करून संबंधित जात वगळण्याकरिता किंवा जातीचा समावेश करण्यासाठी राज्य शासनास अभ्यासपूर्ण शिफारस करतो.
प्रा. हरी नरके हे पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष देखील आहेत. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख म्हणून प्रा.हरी नरके यांनी योगदान दिले आहे.