आ.सुरेश धस यांच्या हस्ते रविवारी देवळाली ते कडा पंधरा कोटी रुपयांच्या रस्ता कामाचा शुभारंभ
क्लिक2आष्टी अपडेट-आष्टी तालुक्यातील देवळाली ते कडा हा 18 किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत खराब झाला होता यावरून प्रवास करताना वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात कसरती कराव्या लागत होत्या.त्यासाठी आमदार सुरेश धस यांनी विशेष प्रयत्न करून देवळाली ते कडा या रस्त्यासाठी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असुन या कामाचा शुभारंभ आज रविवारी सकाळी नऊ वाजता आ सुरेश धस यांच्या हस्ते घाटापिंपरी येथे होणार असुन परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शामआबा तळेकर यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे तालुका अध्यक्ष अॅड.साहेबराव म्हस्के राहणार आहेत.

देवळाली पासूनच्या अनेक गावांचा कडा-आष्टी या शहरांची दररोज संपर्क असून येथून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कडा,आष्टी येथे दररोज ये जा करावी लागते तसेच शेतकरी वर्ग ही मोठ्या प्रमाणामध्ये बाजारपेठेमध्ये येण्यासाठी या मार्गावरून प्रवास करत आहेत. देवळाली ते कडा हा 18 किमी अंतराचा रस्ता अत्यंत खराब झाला होता.यावरून प्रवास करताना वाहनधारकांना मोठ्या कसरती कराव्या लागत होत्या या ठिकाणी अनेक वेळा अपघातही झाले होते या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आमदार सुरेश धस यांनी विशेष लक्ष केंद्रित करून 15 कोटी रुपये निधी मंजूर करून घेतला आहे.यामध्ये तीन पुलांचा समावेश आहे. या कामाची निविदा प्रक्रिया संपूर्ण पूर्ण झाली असून हॉट मिक्स पद्धतीने हा रस्ता तयार होणार आहे. पाथर्डी तालुक्यातील जिल्हा सरहद ते देवळाली,घाटा,पिंपरी दादेगाव,डोंगरगण,कडा असा हा हॉट मिक्स रस्ता तयार होणार असल्याने अनेक वर्षापासून रखडलेला रस्त्याचा प्रश्न आमदार सुरेश धस यांच्या प्रयत्नामुळे मार्गी लागला आहे.तरी आज होणाऱ्या कार्यकमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तळेकर यांनी केले आहे.