मुख्य रस्ताबरोबरच परिसरातील रस्तेही मार्गी लावणार-आमदार सुरेश धस
रविवारी कडा-देवळाली रस्ता कामाचा शुभारंभ
क्लिक2आष्टी अपडेट-पाथर्डी सरहद्द आल्हनवाडी,देवळाली,पिंपरी, दादेगाव,डोंगरगण,कडा या रस्त्याची अनेक दिवसांपासून दुरावस्था झाल्यामुळे या परिसरातील शेतकरी,व्यापारी यांची फार मोठी अडचण होती.त्यामुळे देवळाली ते कडा या रस्त्याचा शुभारंभ आज होतो आहे ही अत्यंत समाधानाची बाब असून या रस्त्याबरोबरच परिसरातील रस्त्याची कामे आपण लवकरच करणार असल्याचे प्रतिपादन आ. सुरेश धस यांनी केले.

देवळाली ते कडा या रस्ता १५ कोटी रुपये कामाच्या साडेसतरा कि. मी.अंतराचा शुभारंभ आ.सुरेश धस यांच्या हस्ते पिंपरी चौक या ठिकाणी केला यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी जि. प.सदस्य रावसाहेब शिरसाट हे होते.पुढे बोलताना आ.सुरेश धस म्हणाले की,अर्थसंकल्पीय रस्ते कामांमध्ये ५० कोटी रु.मंजूर झाले होते त्यापैकी १५ कोटी रु.किमतीचा असलेला देवळाली ते कडा या एकाच रस्त्यासाठी आपण दिले असून उर्वरित मतदार संघासाठी ३५ कोटी रु. दिले आहेत.कारण गेल्या अनेक वर्षापासून कडा, डोंगरगण, दादेगाव, पिंपरी, देवळाली, खरकटवाडी येथील ग्रामस्थांची हा रस्ता दर्जेदार प्रतीचा व्हावा अशी मागणी होती त्यानुसार दि.१३ रोजी रविवारी हा शुभारंभ होत ही अत्यंत समाधानाची बाब आहे.देवळाली ते कडा या रस्त्यावर १० पूल मोठे आणि २ लहान पूल होणार असून ३.७५ मीटर एवढा रुंदीचा असून साईड पट्ट्या बाजूने नाली बांधकाम होणार असल्यामुळे या रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतकऱ्यांनी हा रस्ता पूर्णपणे रुंदीचा व्हावा यासाठी कोणी अतिक्रमण केले असेल तर त्याने आपणहून काढून घ्यावे आणि हा दर्जेदार रस्ता व्हावा यासाठी शासनाला सहकार्य करावे तसेच या १७ किलोमीटर अंतरातील आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी येत्या महिन्या दीड महिन्यात आपापल्या पाईपलाईन करायच्या असतील तर रस्ता खोदून पाईप टाकून घ्यावेत एकदा दर्जेदार रस्ता झाल्यानंतर शेतकऱ्यांनी हा रस्ता खोदल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे सांगून लोकशाही अत्यंत स्वस्त झाल्याचे सांगत कोणीही यावे रस्ता खोदून पाईप टाकावेत अशी परिस्थिती यापुढे होऊ नये अशी तंबी देखील त्यांनी यावेळी दिली.परिसरातील नागरिकांनी या कामावर लक्ष ठेवावे आणि दर्जेदार काम करून घ्यावे असे सांगून ” बेस्ट कन्स्ट्रक्शन्स ” ही चांगली कंपनी असून त्यांनी यापूर्वी दर्जेदार कामे केली आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना त्यांनी यावेळी हे काम मुदतीपूर्वी म्हणजे दि.२८ फेब्रुवारी २०२४ पूर्वी करून दाखवावे असे आवाहन केले.

या रस्त्याबरोबरच गंगादेवी ते अरणविहिरा ४.५० किलोमीटर दादेगाव ते इमनगाव देवळाली ते वेलतूरी, चिंचेवाडी ते अरणविहीरा, या रस्त्याची कामे देखील आपण लवकरच मार्गी लावणार आहोत असे सांगून त्यांनी जलजीवन मिशन अंतर्गत कामांसंबंधी दर्जेदार कामे करून लोकांना पिण्याचे पाणी मिळेल असे काम करावे असे सांगून पाण्याऐवजी नळ योजनेतून हवा बाहेर आल्यास जनतेकडून आम्हाला देखील हवा खावी लागेल अशी मिस्कील टिपणी त्यांनी केली.केंद्र शासनाद्वारे आरोग्यासाठी अनेक चांगले उपक्रम राबवण्यात येत असून प्रत्येक नागरिकांनी आपले आयुष्यमान भारत अंतर्गत आपले कार्ड काढून घ्यावे कारण ५ लाख रुपये पर्यंतच्या शस्त्रक्रिया आजारावरील उपचार मोफत करण्यात येणार असल्यामुळे गावोगावातील कार्यकर्त्यांनी याबाबत लक्ष घालून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी शेवटी केले प्रास्ताविक करताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण मार्कंडे यांनी या रस्ता कामाचे ३ महिन्यात अंदाजपत्रक तांत्रिक मान्यता प्रशासकीय मान्यता घेतली असून आमदार सुरेश धस यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हे काम लवकर मंजूर होऊन शुभारंभ आज होत आहे असे सांगितले.

या यावेळी कडा साखर कारखान्याचे माजी चेअरमन विष्णुपंत चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब शिरसाट, दूध संघाचे अध्यक्ष संजय गाढवे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामहरी महारनोर, धामणगाव सरपंच मनोज गाढवे,कडा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संजय ढोबळे,श्याम तळेकर, अशोक लगड, राजेंद्र दहातोंडे, कडा ग्रामपंचायतचे उपसरपंच बाळासाहेब कर्डिले, राजाभाऊ कर्डिले, रमेश तांदळे, दत्ता चव्हाण,देवळालीचे सरपंच पोपट शेकडे,बाबासाहेब मुळीक,दिगंबर घोडके, चांगदेव शेळके,अशोक घुमरे,सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपा अभियंता शिवाजी सानप,कार्यकारी अभियंता मार्कंडे,उपअभियंता शिवाजी सानप,रावसाहेब संजय गाढवे,राजेंद्र दहातोंडे,रमेश तांदळे,राजू म्हस्के,दत्तात्रय चव्हाण,विकास आमटे,दिपक वामन,बाबासाहेब सचिव,प्रविण मुळीक, मोहन आमटे,सरपंच पोपट शेकडे,प्रतिभा शिंदे,अर्चना आमटे,बबन वायभासे,विलास शिरसाठ,सदाशिव घुमरे, मच्छिंद्र मुळीक,राजेंद्र म्हस्के,बुवा साहेब शेकडे,बंडू तळेकर,शैलेश मोहिते,भारत म्हस्के,बालाजी घुले,राजू शेख,वसंत आहेरकर,वसंत बांदल,प्रवीण भूकन,अशोक दहातोंडे,शिवाजी थोरात,बाबासाहेब मुळीक,अशोक शेकडे यांचे समवेत घाटा पिंपरी येथील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागचंद झांजे यांनी केले.