राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवक तालुकाध्यक्ष पदी ॠषिकेश दरेकर
क्लिक2आष्टी अपडेट-माजी आमदार साहेबराव दरेकर नाना यांचे नातू व राजाभाऊ दरेकर यांचे चिरंजीव तरुण तडफदार ॠषिकेश दरेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक तालुकाध्यक्षपदी प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख यांनी निवड केली आहे. आष्टी तालुक्यातील धानोरा येथील कामधेनू मंगलकार्यालयात बैठक संपन्न झाली.दि.१७ गुरूवारी होणार्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सभेच्या पुर्वतयारी संदर्भात बैठक संपन्न झाली होती.या बैठकीत प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही निवड केली आहे.

सध्या राष्ट्रवादी मध्ये झालेली फुट,विस्कटलेली घडी पुन्हा व्यवस्थित करण्याचे काम सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे.त्याच अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.राष्ट्रवादीला आष्टी तालुक्यामध्ये माजी आमदार साहेबराव दरेकर सारखे अनुभवी व खमके नेतृत्व मिळाले आहे.आणि त्यांच्या माध्यमातून आता पुन्हा राष्ट्रवादी प्रबळ होणार असल्याचे बोलले जात आहे.आणि त्याच खमक्या नेतृत्वाचे नातू ॠषिकेश दरेकर पुढे आले आहेत.यामुळे आता नविन युवकांची फळीही ॠषिकेशच्या माध्यमातून आपल्याला दिसणार आहे. आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना दरेकर म्हणाले की,येणाऱ्या काळात मी युवकांची मोठी फळी निर्माण करणार व माझे आजोबा दरेकर नानांच्या माध्यमातून मी राष्ट्रवादीचे चांगल्या प्रकारे कार्य करणार अशी माहितीही त्यांनी दिली आहे. त्याच्या निवडीबद्दल त्यांचे बीडचे आमदार तथा नवनिर्वाचित राष्ट्रवादीचे बीड जिल्हाध्यक्ष संदिपभैय्या क्षिरसागर,युवा प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख,माजी आ.साहेबराव दरेकर नाना,परमेश्वर शेळके,बापूसाहेब डोके,माजी आमदार सय्यद सलीम,रविकाका ढोबळे,रामभाऊ खाडे,युवा नेते धैर्यशील थोरवे,माजी सरपंच केशव चव्हाण,युवा नेते सागर दरेकर, सह सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या वेळी हतोळन सरपंच बाळासाहेब मिसाळ,साकत सरपंच ज्ञानदेव सासवडे,भरत घोडके,धानोरा माजी सरपंच उदावंत,शेरी सरपंच संजय थोरवे,संतोष वाडेकर,कुंबेफळ माजी सरपंच मुठे,आदिनाथ पडोळे,बाबू चव्हाण,रभाजी पारखे,शहाजी लकडे,खरडगव्हाण माजी सरपंच वाडेकर,किशोर माळशिखरे,इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.