व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

शेवटपर्यंत आ.सुरेश धसांचा सेवक म्हणून काम करणार-विजय गोल्हार

धस कुटूंबियांचा त्याग हा कुठल्याही तराजूत मोजला जाऊ शकत नाही

0

आष्टी-आपला मतदार संघ जर पश्चिम महाराष्ट्रातील मतदार संघासारखा करायचा असेल तर ते फक्त आणि फक्त आ.सुरेश धसच करू शकतात कारण त्यांच्यात तशी धमक असून,आपण गट-तट बाजूला ठेऊन फक्त विकास कामासाठी शेवटच्या श्वासापर्यंत आ.सुरेश धस यांचा सेवक म्हणून काम करणार असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य विजय गोल्हार यांनी सांगीतले.
आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथे ५ कोटी रुपये रामा ७० ते बावी-बीडसांगवी-शेकापूर-आष्टी रामा ५७ रस्ता, प्रजिमा – १२ किमी – ७/०० ते १५/०० मध्ये सुधारणा करणे या रस्ते विकास कामांचा शुभारंभ आज आ.सुरेश आण्णा धस यांच्या हस्ते संपन्न झाले.याप्रसंगी विजय गोल्हार बोलत होते.पुढे बोलतांना गोल्हार म्हणाले,मतदार संघाचा विकास करण्यासाठी आ.सुरेश धस यांच्या माध्यमातून गेल्या वीस वर्षापासून त्यांची धडपड सुरू आहे.परंतु आता राज्यात केंद्रात आपले सरकार आहे.त्यामुळे तुम्ही मतदार संघातील दहावे,तेरावे,वर्षश्राध्द तसेच इतर किरकोळ कामे आम्ही बघू तुम्ही मुंबईलाच जाऊन थांबा आणि मतदार संघात मोठ्या प्रमाणावर विकास कामे आणा माझं आणि आ.धस यांचे जमत नसल्याचे ब-यांच जणांचे म्हणणे आहे पण आपण शेवटपर्यंत आ.धसांचा सेवक म्हणून काम करणार असल्याचे सांगत घरात बसून विकास होत नसतो त्यासाठी धस कुटूंबियांचा त्याग हा कुठल्याही तराजूत मोजला जाऊ शकत नाही.२८ वर्ष असलेल्या आ.धस यांच्या पुञाला मनक्यांच्या ञासाला सामोरे जावे लागतं याचे मुख्य कारण म्हणजे जनसेवेचा घेतलेला वसा स्वस्थ बसून देत नसल्याचे आपल्या समोर असल्याचेही गोल्हार यांनी सांगीतले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.