व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

अब्दुल सत्तार हा पैसे खाऊ अन् भंगार मंञी-आ.बाळासाहेब आजबे

आष्टी मतदार संघातून कृषी मंञी अब्दुल सत्तार यांचा जाहिर निषेध

0

आष्टी-खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर आंदोलन सुरू आहेत.अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यांचा आष्टी मतदारसंघही सहभागी असून,सत्तार हे राज्याला लागलेली किड,पैसे खाऊ अन् भंगार मंञी असल्याची टिका आ.बाळासाहेब आजबे यांनी केले आहे.
नेमकं काय म्हणाले कृषीमंञी सत्तार,पन्नास खोक्यांचा आरोप कुणी तरी केला.त्यावर कुणीही आम्ही ते घेतले नाही हे कोणीच म्हटले नाहीत.त्यांनी खोक्याचे आरोप फेटाळले नाहीत.हे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले होते.त्यावर अब्दुल सत्तारांची जीभ घसरली.त्यांनी थेट सुप्रिया सुळे यांना टार्गेट करीत भिकार असे व्यक्तव्य केले आहे.याचविरोधात राज्यभर संताप सुरू आहे.त्या वादाचे पडसाद आष्टी मतदार संघातही उमटले असून,अब्दुल सत्तार हे भंगार मंञी आहेत ते दुष्काळ पाहणी दौरा करायला आल्यावर कलेक्टरला म्हणतात दारू पितात का?आज खा.सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत जे वक्तव्य केले ते कुणीचे आहे.त्यांनी केलेल्या व्यक्तव्यांचा आम्ही जाहिर निषेध करत असून,राज्याला लाभलेले कृषीमंञी हे पैसे खाऊ अन् भंगार मंञी असून त्यांची मंञीपदावरून हाकलपट्टी करावी अशी मागणीही आ.बाळासाहेब आजबे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.