चालू वर्षात न्यू आष्टी रेल्वे धावणार इगनवाडी पर्यंत;अहमदनगर-बीड-परळी रेल्वेचे काम प्रगती पथावर
रेल्वे विभागाची प्रसिध्दीपाञकाव्दारे माहिती
गणेश दळवी आष्टी-अहमदनगर- बीड -परळी नवीन लाईन हा एकूण लांबी २६१.२५ किमी प्रकल्प असून,मागील वर्षी २३ संप्टेंबर २०२२ रोजी ६६.१८ कि.मी.पुर्ण अहमदनगर ते न्यू आष्टी फेरीही सुरू झाली आहे.या न्यू आष्टी ते इगनवाडी हा ६७.१२ कि.मी.रेल्वे मार्ग पुर्ण होत असून,या वर्षा अखेर अहमदनगर ते इगीनवाडी पर्यंत रेल्वे धावणार असून एकूण २६१.२५ कि.मी.पैकी १३३.३ कि.मी.काम आता पुर्ण होऊन लवकरच रेल्वे धावणार असल्याने आता लवकरच अहमदनगर-परळी रेल्वे मार्ग पुर्ण होणार असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या अनेक वर्षापासून बीडकरांचे अधुरे राहिलेले स्वप्न आता पुर्णत्वाकडे जात असून अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे प्रगती पथावर काम सुरू आहे.हा मार्ग एकूण २६१.२५ कि.मी.चा असून या पैकी २३ सप्टेंबर २०२२ रोजी अहमदनगर-न्यू आष्टी पर्यंत पुर्ण होऊन रेल्वेची नियमित फेरीही सुरू झाली.आता दुस-या टप्यात न्यू आष्टी ते इनगवाडी हे काम या वर्षाअखेर पुर्ण होत आहे.

ह्या रेल्वे प्रकल्पाची एकूण किंमत- ४८०८.१७ कोटी असून आजपर्यंतचा खर्च- ३६४६.०९ कोटी खर्च केले आहेत,या कामाची एकूण भौतिक प्रगती- ७८%,
जमीन संपादन पूर्ण-१८२१ हेक्टर पैकी १८०६ हेक्टर म्हणजे (९९%).जमिन संपादीत झाली आहे.व आता इगनवाडी ते परळी हा १२७.९५ कि.मी.रेल्वे प्रकल्पाचे काम प्रगती पथावर आहे.

आत्ता पर्यंत पूर्ण झालेली कामे
✅ अर्थ वर्क-४३० LCum/४१८ LCum (९७%)
✅ प्रमुख पूल- ६४/४९ (७७%)
✅ छोटे पूल/RUB- ३०२/२४९ (८२%)
✅रोड ओव्हर ब्रिज- ६५/१४(२१%)
✅रोड अंडर ब्रिज- १३०/११० (८५%)
✅स्टेशन इमारती- २१/१० (२९%)
✅ट्रॅक लिंकिंग-२६१/११५ 115 किमी (४४%)
✅पॉवर लाईन क्रॉसिंग- ६२६/५६८(९१%)
✅बॅलास्ट पुरवठा-७.५२/६.४४ एलसीएम (८६%)
✅विद्युतीकरण- निविदा मंजूर झाली.

अशी माहिती मध्य रेल्वे,मुंबई प्रसिध्दीपञक जनसंपर्क विभाग, यांनी जारी केलेल्या दिनांक २९ सप्टेंबर २०२३ प्रप क्रमांक २०२३/०९/४९ नुसार प्रसिध्द केली आहे.