व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

अहमदनगर-न्यू आष्टी आजपासून रेल्वेसेवा बंद;रेल्वे विभागाने केले जाहिर

0

click2ashti update-सोमवारी अचानक लागलेल्या आगीमुळे गाड़ी क्र. 01401/01402 अहमदनगर-न्यू आष्टी-अहमदनगर हि गाड़ीचा रॅक उपलब्ध नसल्यामुळे आज दिनांक 17.10.2023 ते पुढील आदेश येई पर्यंत ट्रेन रद्द करण्याचे मध्य रेल्वे प्रसाशनने ठरविले आहे.तरी सर्व संबंधित रेलवे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी.असे अवाहनही रेल्वे प्रशासनच्यावतीने करण्यात आले आहे.

याबाबत अधिक असे की,अहमदनगर-न्यू आष्टी रेल्वेने सोमवार दि.१६ रोजी न्यू आष्टीवरून अहमदनगरकडे जातांना नारायण डोहच्या पुढे असलेल्या नगर सोलापूर हायवे वरील गेट जवळ अचानक पेट घेतल्याने,यामध्ये रेल्वेचे चार डब्बे भस्मसात झाले.आता या मार्गावर येण्यासाठी रेल्वे रॅक उपलब्ध नसल्यामुळे गाडी आज मंगळवार दि.17/10/2023 पासून पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आली आहे.तरी सर्व प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असे अहवान रेल्वे प्रशासनच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.