व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

अदिवासी महिलेला विवस्ञ करून मारहाण प्रकरणाची संपूर्ण घटना खोटी,बोलवता धनी वेगळाच-आमदार सुरेश धस

आमदार सुरेश धस यांची पञकार परिषद

0

click2ashti update-वाळुंज येथील घटना संपूर्णपणे खोटी असून या घटनेमागे “बोलवता धनी ” वेगळाच आहे.घटनेचा या ठिकाणी काढण्यात आलेल्या व्हिडिओत छेडछाड करण्यात आला आहे.छेडछाड करुन तो व्हिडिओ दाखवण्यात येत आहे.या घटनेमध्ये कुठलाही तथ्यं नाही, अॅट्रोसिटीच्या या गुन्ह्याप्रकरणी मी पोलिस विभागाला हा गुन्हा दाखल करावा,असे सांगितले आहे. पोलिस विभागाने यामध्ये सखोल चौकशी करून फॉरेन्सिक लॅबमध्ये या व्हिडिओचे संभाषण आणि आणि घटनाक्रम तपासून याची घटनेची कसून चौकशी करावी.या घटनेचे तथ्य जनतेसमोर तात्काळ यावे अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी पञकार परिषदेत दिली आहे.
आष्टी येथील औव्दैतचंद्र या निवासस्थानी दि.२३ सोमवारी दुपारी ४ वा.आयोजित करण्यात आलेल्या पञकार परिषदेत आमदार सुरेश धस बोलत होते.पुढे बोलतांना आ.धस म्हणाले,या घटनेमध्ये डायल ११२ साडेतीन वाजता तक्रार देण्यात आली आणि त्यानंतर साडेतीन ते चार पर्यंत या कालावधीत रघुनाथ पवार व भोसले यांचे वाद झाला.त्यानंतर ४.१० मि रधुनाथ पवार यांनी माझी पत्नी प्राजक्ता धस हिस फोन केला त्यानंतर माझी पत्नी व पोलिस घटनास्थळी जाण्यासाठी निघाले व त्यानंतर साडेचार च्या नंतर माझी पत्नी पावणेपाच च्या दरम्यान व पोलिस तिथे सोबतच पोहचले त्यानंतर तक्रारदार व आरोपी यांचे संभाषण झाले त्याचे चिञकरण तक्रारदारानेच केले आहे.त्यानंतर जो दुसरा आरोपी आहे राहूलु जगदाळे हा पाच वाजून दहा मिनिटाने तिथे पोहचला व डायल ११२ चे पोलिस कर्मचारीही तिथे पोहचले.परंतु यानंतर सर्वांनी एकमेकांची समजूत काढली पण तक्रारदाराने आगोदरच सर्व प्लॅन बनवून ठेवत नंतर या व्हिडीओचे मक्सिंग करत याचा एक वेगळाच व्हिडीऔ बनवून बदनाम करण्याचा डाव तक्रारदाराने केला आहे.परंतु हा सर्व व्हिडीओचे बेवनाव करण्यात आला असून,हा व्हिडीओ कुणी व्हायरल केला?,या तक्रारदारांना कुणी नगरला बोलविलं?,यांना आॅनलाईन तक्रार करायला कुणी करायला लावले याची चौकशी करून,मला व माझ्या कुटूंबीयांना बदनाम करण्याचा डाव कुणी केला.याची लवकरात लवकर तपास करावा व पोलिसांनी पारदर्शकपणे कुणाच्याही दबावाला बळी न पडता योग्य तो तपास करावा अशी मागणीही आमदार सुरेश धस यांनी केली आहे.
स्वत;च कपडे काढून पुरूषाच्या मागे पळणं म्हणजे दिंड काढणे होते का?
जर हा व्हाडीओ पाहिला तर यामध्ये सदरील महिलेने स्वत;च कपडे काढून ती महिला सदरील पुरूषाच्या मागे पळत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.जर एखाद्या महिलेची विवस्ञ दिंड काढली म्हणल्यावर स्वत;महिलेनी कपडे काढून पुरूषांच्या मागे पळणे म्हणजे महिलेची दिंड काढली असे होते का? असा प्रश्न हा व्हिडीओ पाहिल्यावर नागरिकांना पडत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.