मराठा आंदोलनामुळे षंढ म्हणून घरात बसण्याची वेळ माझ्यासह सर्वच राजकीय पुढाऱ्यांच्यावर आली-आमदार सुरेश धस
सरकारने तात्काळ आरक्षणाचा निर्णय घ्यावा,आमदार धसांची पञकार परिषदेत माहिती
click2ashti update-कोरोना काळात 24 तास बाहेर असणारा मी आता मात्र मराठा आंदोलनामुळे षंढ म्हणून घरात बसण्याची वेळ माझ्यासह सर्वच राजकीय पुढाऱ्यांच्यावर आली आहे ही अत्यंत खेद जनक बाब आहे.शासनाने या बाबत मराठा समाजाचा उद्रेक होण्या आगोदरच आता परिस्थिती हाताबाहेर चालली असून,राज्य शासनाने आता कसलाही वेळ न घेता मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे नसता समाजाकडे कोणते तोंड घेऊन जाणार असल्याचे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले आहे.
आष्टी येथील औव्दैतचंद्र या निवासस्थानी रविवार दि.२९ रोजी सांयकाळी साडेपाच वाजता आयोजित करण्यात आलेल्या पञकार परिषदेत आ.धस बोलत होते.पुढे बोलतांना आ.धस म्हणाले,कोरोना सारख्या भंयकर साथीतही आम्ही घरात बसलो नाहीत पण आत्ताच्या मराठा आरक्षण मागणीसाठी आम्हाला षंडा सारखे घरी बसावे लागत आहे.हि बाब भंयकर असून,सध्या मराठवाड्यातील ९९ मराठासमाज अरक्षापासून वंचित आहे.आणि या मराठाच्या बाजूने जरांगे बाजू लढावी लागली.आता आम्हालाही त्यांची बाजू घ्यावी लागणार आहे. शासनाने विना विलंब मराठा समाजाला आरक्षण देणे गरजेचे आहे.गेल्या पाच दिवसापासून कोणत्याच नेताचे समाज ऐकूण घेण्याच्या मनस्थितीत नाही.जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडवीस यांच्याशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे.तरी मा.मुख्यमंञी,उपमुख्यमंञी हे आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आहेत.फडणवीस साहेबांच्या काळात किमान एससीबीसी हे आरक्षण दिले होते,ज्यांनी मराठा समाजासाठी काहि केले त्यांच्या विरोधात समाज जात आहे आणि ज्यांनी आजपर्यंत समाजाला फक्त येड्यात काढून काहिच केले नाही ते माञ आता समाजाचा पुळका आणतात हे माञ दुर्देव आहे.तसेच तरुणांनी आत्महत्या सारखा निर्णय घेऊ नये.यावर तोडगा जरूर निघेल मात्र आत्महत्या हा यावर पर्याय होऊ शकत नाही.त्यामुळे तरूणांनी आत्महात्या सारखा निर्णय घेऊ नये असे अवाहन आ.सुरेश धस यांनी केले.
मराठवाड्यातील पहिला सत्तेतला आमदारांचा जरांगे पाटील यांना पाठिंबा
जरांगे पाटील यांनी गेल्या पाच दिवसापासून सुरू केलेल्या उपोषणाची दखल आता शासनाने कसलीही वेळ न घालविता तात्काळ घ्यावी कारण आता समाजाची ऐकण्याची मन;स्थिती नसून,जास्तीचा उद्रेक न होऊ देता तात्काळ आरक्षण जाहिर करावे अशी मागणी भाजपाचे विधान परिषदचे आमदार सुरेश धस यांनी पञकार परिषदेत केली आहे.त्यामुळे जरांगे पाटील यांना पाठिंबा देणारे सत्तेतील पहिले आमदार सुरेश धस हे ठरले आहेत.आता इतर आमदारांनीही पाठिंबा देणे गरजेचे असल्याची चर्चा सुरू आहे.