व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

राज्याचे गृहमंञी पद देवेंद्र फडणवीस यांच्या आवाक्याच्या बाहेरचे-सुषमा अंधारे

अब्दुल सत्तार यांना सत्तेचा माज

0

मुंबई वृत्तसेवा-राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी सर्व मंञीमंडळाचा गाडा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हाकत आहे.त्यांच्याकडे सहा जिल्ह्याचा भार आहे,अशात कामाचा ताण त्यांच्यावरील वाढला असल्याने त्यांना गृहमंत्री पद झेपत नसून हे पद त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे.त्यांच्या मंत्रिमंडळातील नेते बेताल वक्तव्य करत आहेत.मात्र,त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली जात नाही.फडणवीस गृहमंत्री म्हणून कुचकामी ठरत आहेत अशी टीका शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी मंगळवार दि.८ रोजी पत्रकार परिषद घेत महिलांविरोधात अपशब्द काढणाऱ्या सर्व नेते मंडळींवर तोफ डागली.यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला.अंधारे म्हणाल्या, भाजप सत्तेत आल्यापासून महिलांबद्दल बेताल वक्तव्य केले जात आहेत.देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील अनेक नेते हे बेताल वक्तव्य करत आहेत.राज्यातील भाजपचे आमदार आणि भाजपचे प्रवक्ते रामदास कदम यांनी देखील दहीहंडीत मुलींबद्दल बेताल वक्तव्य केले. तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. नुकतेच संभाजी भिडे हे एका महिला पत्रकारासोबत टिकली लवण्यावरून असभ्यपणे पणे बोलले.मात्र, उपमुख्यमंत्री एक चकार शब्द देखील बोलले नाहीत. अमृता फडणवीस यांना देवेंद्र फडणवीस टिकलीवरुन बोलतील का? असा प्रश्न अंधारे यांनी विचारला.
ज्या पद्धतीने अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्या बद्दल वाईट शब्दांत वक्तव्य केले.मात्र,त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही.नारायण राणे आणि त्यांची दोन मुले हे देखील महिलांबद्दल अतिशय वाईट शब्दांत वक्तव्य करत असतात.गुलाबराव पाटील हे देखील सरंजामी वृत्तीचे असून त्यांची वाक्य देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्रालयाला आक्षेपार्ह वाटत नाही.पोलीस देखील गुलाबराव पाटलांचे हस्तक आहेत, असा घणाघात सुषमा अंधारे यांनी केला आहे.

अब्दुल सत्तार यांना सत्तेचा माज
———————————————
अब्दुल सत्तार यांना सत्तेचा माज आला असून,अब्दुल सत्तार आणि गुलाबराव पाटील यांनी सर्व महिलांची माफी मागावी.अब्दुल सत्तार यांना तुम्ही आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात नोटीस बजावता तर गुलाबराव पाटील यांना नोटीस का बजावत नाही,असा सवाल त्यांनी राज्य महिला आयोगाला विचारला आहे.महिला आयोगाने सिलेक्टिव्ह वागू नये.सत्तार आणि गुलाबराव पाटील यांच्यावर कारवाई होत नसेल तर हे देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन होत असून,अब्दुल सत्तार यांना सत्तेचा माज आला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.