बांधकाम विभागाने रस्त्यांची दर्जेदार कामे तीन महिन्यात पूर्ण करून दाखवावीत-आमदार सुरेश धस यांचे आवाहन
वाळुंज येथे २५.५० कोटी रुपयांचे रस्ते कामांचा भूमिपूजन
आष्टी-चिखली फाटा ते खडकत,वाळुंज ते खडकत आणि आष्टा(ह.ना.) ते जामगाव या रस्त्यांची कामे दर्जेदार आणि गुणवत्ता पूर्ण असलेली,तीन महिन्यात पूर्ण करून दाखवावीत असे आव्हान आमदार सुरेश धस यांनी बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांना दिले असून काम पूर्ण झाल्यानंतरच सत्कार स्वीकारणार आहे असे प्रतिपादन केले.
चिखली फाटा ते खडकत १५ कोटी रू वाळुंज पारगाव ते खडकत ८ कोटी रू आणि आष्टा ह.ना.ते जामगाव २.५० कोटी रू.या रस्ते सुधारणा कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जि.प.सदस्य अमर निंबाळकर,पं.स.सभापती बद्रीनाथ जगताप,मार्केट कमिटी सभापती दत्तात्रय जेवे,अँड.बाळासाहेब झांबरे, गणेश शिंदे,कार्यकारी अभियंता मार्कंडे आदि उपस्थित होते.
आमदार सुरेश धस पुढे म्हणाले की,आष्टा हरिनारायण जिल्हा परिषद गटातील जनतेने गेली अनेक वर्ष खूप मोठा त्रास सहन केला असून या परिसरातील माणसे जवळची असल्याने विकास कामे अगोदर दुसरीकडे करू आणि नंतर येथील कामे करू असे आमचे धोरण होते.२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आपला पराभव झाल्यानंतर या भागात कोणतेही मोठे विकास काम झालेले नाही याची खंत होती परंतु आता शिंदे- फडणवीस यांचे युती शासन आल्यानंतर विकास कामांना निधी कमी पडणार नाही.नवीन शासन सत्तेवर येताच पहिल्याच पत्राद्वारे आपणास ५० कोटी रुपये किंमतीची आठ रस्त्यांची कामे मंजूर केली असून त्याची सुरुवात बीडसांगवी येथून होत आहे.इतर ठिकाणी अद्यापही अंदाजपत्रके करण्याचीच काम सुरू आहेत पण आपण तात्काळ पाठपुरावा केल्यामुळे आज प्रत्यक्ष कामास सुरुवात देखील झाली आहे.२०१४ च्या निवडणुकीत माझा पराभव झाल्यानंतर या भागात कोणीही विकास कामे केली नाहीत मात्र २०१८ मध्ये विधानपरिषद सदस्य झाल्यानंतर टाकळसिंग ते हिंगणी, इमनगाव ते हनुमंतगाव, टाकळसिंग ते खानापूर या रस्त्यांची कामे केली मात्र २०१९ पासून झालेल्या नवीन आमदारांनी सत्ताधारी पक्षाचे सदस्य असून देखील या भागात अडीच वर्षामध्ये अडीच रुपयाचे देखील विकास काम केले नाही मात्र तात्कालीन मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी व्यक्तिगत संबंध असल्यामुळे त्यांनी अडीच कोटी रुपये रस्ता कामाला मंजूर केले होते.मात्र आता शिंदे आणि फडणवीस सरकारने पन्नास कोटी रुपये मंजूर केले.त्यातील २५ कोटी रुपये केवळ आष्टा हरिनारायण गटातील तीन रस्ते कामांसाठी मंजूर करण्यात आले आहेत.बाकीची दोन कामे धानोरा ते लोणी,या रस्त्यासाठी आणि मराठवाडी ते दौलावडगाव,या रस्ता कामासाठी तर तीन कामे हे पाटोदा आणि शिरूर येथे करण्यात येणार आहेत.
रस्त्यांच्या कामाशिवाय विकासाला चालना मिळत नसते असे सांगत आमदार धस म्हणाले की,गोरगरीब सर्वसामान्यांना रहदारीसाठी खूपच त्रास सहन करावा लागला आहे.यापूर्वी रस्त्यांची कामे दर्जेदार झाले नाहीत त्यामुळे आता बाहेरच्या ठेकेदारांना कामे देण्यात आली आहेत.जामगाव ते वाळूंज रस्त्याची दुरावस्था झाली असून.निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराची अनामत रक्कम जप्त करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली.त्याचबरोबर या भागात अवैध वाळू उपसा करणारी मोठी वाहने असून या वाहनांच्या रहदारीमुळे या भागातील रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे.रस्ते उखडलेले आहेत ही वाहने बंद करण्यासाठी नागरिकांनी पुढे आले पाहिजे.अवैध वाळू माफीयांनी नद्या उपसून टाकल्या असून आता शेतातील वाळू खणन सुरू झाले आहे.ही बाब गंभीर असल्याने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.यानंतर रुटी ते खानापूर, टाकळसिंग ते हनुमंतगाव,तलवार प्रकल्प डाक बंगला ते वाळुंज या रस्त्यांची कामे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात येतील असे सांगितले.यावेळी सरपंच सतीश धस,विनोद रोडे,पै.अमोल शिंदे,रघुनाथ शिंदे,दत्तात्रय गर्जे,बाळासाहेब बोराडे,संदीप खेडकर,विष्णू खाडे, संभाजी भांगे,अभियंता कुलकर्णी आदीसह जामगाव,बळेवाडी, खडकत,चिखली,हिंगणी,वाळूंज,सांगवी आष्टी या गावातील प्रमुख कार्येकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आष्टी येथे पाटबंधारे यांत्रिकी उपविभाग सुरू करणार
————————————————————————————————
यावर्षी तालुक्यातील सर्व तलाव पूर्ण भरले असून शेती सिंचनासाठी सर्व तलावांच्या कॅनॉलची दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्यामुळे प्रत्येक तलावाच्या अंतर्गत असलेल्या कॅनॉलच्या शेवटच्या गावातील शेतकऱ्यापर्यंत पाणी सोडता येईल.यासाठी पाटबंधारे विभागातील यांत्रिकी उपविभाग आष्टी येथे सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले या उपविभागाद्वारे उपलब्ध होणाऱ्या मशिनरीद्वारे कॅनल दुरुस्तीची कामे लवकर होत असल्याने आपण हा उपविभाग सुरू करणार असल्याचे सांगितले.यावेळी मनोगत व्यक्त करताना कार्यकारी अभियंता मार्कंडे यांनी ही रस्ता कामे मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात विक्रमी वेळेत कामे सुरू करण्यात आली असून या कामाचा शुभारंभ करण्यात येत आहे याचे संपूर्ण श्रेय आमदार सुरेश धस यांना असल्याचे सांगितले.