व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टीत आ.बाळासाहेब आजबे यांच्यावतीने दीपावली फराळाचा कार्यक्रम संपन्न

कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य जनतेची मोठी उपस्थिती

0

click2ashti update-आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी साई दत्त लॉन्स कासारी आष्टी येथे दीपावली निमित्त फराळाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी आष्टी तालुक्यातून कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य जनतेने ही मोठ्या संख्येने उपस्थिती लावत आमदार बाळासाहेब आजबे यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला.

आष्टी येथे साई दत्त मंगल कार्यालयात आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व आमदार बाळासाहेब आजबे काका मित्र मंडळाच्या वतीने दीपावली फराळ व पानसुपारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होतेयावेळी माजी अध्यक्ष डॉक्टर शिवाजी राऊत,तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी,विश्वास नागरगोजे,ज्येष्ठ नेते काकासाहेब शिंदे सुनील दादा नाथ हरिभाऊ दहातोंडे जगन्नाथ ढोबळे या प्रमुख नेत्यांसह सकाळी दहा ते दुपारी पाच वाजेपर्यंत कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.यावेळी आमदार बाळासाहेब आजबे यांनी प्रत्येक गावातील आलेल्या लोकांची भेट घेत गावातील समस्या जाणून घेत ताबडतोब सोडण्याचे आश्वासन दिले.आमदार बाळासाहेब आजबे सकाळी दहा वाजल्यापासून या ठिकाणी पूर्ण वेळ उपस्थित असल्याने आलेल्या सर्व कार्यकर्त्यांची मनमोकळेपणाने गप्पा गोष्टी करत दीपावली फळाचा कार्यकर्त्यां बरोबर आनंद लुटला,आष्टी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेबरोबरच आष्टी शहरातील व्यापारी बांधव डॉक्टर शेतकरी कार्यकर्ते यांच्यासह हजारोच्या बांधवांनी दीपावली फळाचा आस्वाद घेत आमदार बाळासाहेब आजबे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

रविवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी पाटोदा तालुक्यातील जनतेसाठी ही फराळाचे आयोजन करण्यात आले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाटोदा व आमदार बाळासाहेब आजबे काका मित्र मंडळ यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.