कर्जवसुली करण्यासाठी गेलेल्या बॅक कर्मचारी तरूणीचे जुळले,कर्जदाराच्या मुलाशी जुगाड;पळून जाऊन केले लग्न
महिन्यात सासरच्यांनी दाखवले रंग; हाॅटेल वर नेत मारहाण, जातीवाचक शिवगाळ;आष्टी पोलिस ठाण्यात फसवणूकीसह अॅस्ट्रासिटी गुन्हा दाखल
click2ashti update-येथील एका बॅकेचे कर्जदार असलेल्या व्यक्तीच्या मुलासोबत ओळख झाली.ओळखीचे रूपातंर प्रेमात झाल्यावर घरच्यानी मुलीचे लग्न जमविल्याचे समजातच प्रियकराने तिला सोबत घेऊन धुम ठोकून लग्न लावले.पण महिन्यांतच सासरच्यांनी रंग दाखवत मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केली.यात आपली फसवणूक झाल्याचे समजातच महिलेच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी येथील एका बॅकेतून बाळासाहेब करडुळे यांनी कर्ज काढले होते.याच कर्जाच्या वसुलीसाठी महिन्याकाठी हप्ता असल्याने तो घेण्यासाठी बॅकेत कामाला असलेली महिला कर्मचारी शिराळ येथील त्याच्या घरी जायची यायची यातुन शुभम करडुळे याच्याशी ओळख झाल्यावर बोलणे वाढत गेले व दोघेही एकमेकाच्या प्रेमात बुडत आयुष्भर सोबत राहण्याच्या आणाभाका खाल्या.पण काही दिवसापुर्वी मुलीच्या घरच्यानी तिचे लग्न ठरवल्याचे तिने प्रियकराला सांगताच त्याने तिला फोन करत आपण पळवून जाऊ मी तुला कशाची कमी पडू देणार नाही.असे म्हणत ते १७ आक्टोबर रोजी सायंकाळी हे प्रेम युगलाने पळून जाऊन लग्न लावत नगर जिल्ह्य़ातील एका हाॅटेलवर आले.तिथे आठ दिवस राहिल्यावर प्रियकर पुण्याला कामानिमित्त जात असल्याचे सांगुन तिथुन निघून गेला.आणि तिला आई,वडिलाकडे जा म्हणून सांगितले.तिला बेल्टने मारहाण करत शिवीगाळ केली.व याच वेळी सासू,सासरा यांनी देखील फोन वर जातीवाचक शिवीगाळ करत आम्ही तुला नांदवणार नाहीत.असे जातीवर हिनवले.मग मला माझी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मला मारहाण, जातीवाचक शिवगाळ,फसवणूक केल्या प्रकरणी आरोपी पती शुभम बाळासाहेब करडुळे,बाळासाहेब रावसाहेब करडुळे सासरा,रुक्मिणी बाळासाहेब करडुळे सासु सर्व रा.शिराळ ता.आष्टी या तिघांविरुद्ध महिलेच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात
मारहाण,फसवणूक,जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर करीत आहेत.