शेतक-यांना मदत मिळावी म्हणून आमदार आजबेंचा जनअक्रोश मोर्चा
पाटोदा येथील जनअक्रोश मोर्चास मोठ्या संख्येने उपस्थित रहा
आष्टी-आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील सर्वच भागामध्ये अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने आमदार बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय पाटोदा येथे हजारोंच्या संख्येत विराट जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.
सध्याचे शिंदे व फडणीस सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांना कसलाही प्रकारची मदत मिळाली नाही अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे मदत देण्याऐवजी सरकार आरोप प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहेत शेतकरी विरोधी शिंदे सरकारला शेतकऱ्यांचे कसलेही घेणेदेणे नाही सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी पुत्र आमदार बाळासाहेब आजबे काका यांचे नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस त्याचबरोबर मित्रपक्ष अशा महाविकास आघाडीच्या वतीने उपविभागीय कार्यालय पाटोदा येथे विराट जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या उपस्थितीत विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात येणार आहे.यामध्ये प्रामुख्याने आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील सर्व शे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी,पंचनामे न करता पिक विमा कंपनीने पिक विमा मंजूर करावा,कृषी पंप धारक शेतकऱ्यांना मोफत विद्युत पुरवठा करण्यात यावा,श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थींचे अर्ज तात्काळ निकाली काढावेत, पिक विमा संदर्भातील जाचक अटी रद्द कराव्यात,या व अशा विविध शेतकऱ्यांच्या मागण्या संदर्भात विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, या मोर्चात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.