व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

स्वामी विवेकानंद शिक्षक पतसंस्थेच्या १७ जागेसाठी ११३ उमेदवारी अर्ज दाखल

शुक्रवारी होणार अर्ज छाननी

0

click2ashti update-स्वामी विवेकानंद सहकारी शिक्षक पतसंस्थेच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी १७ जागेसाठी ११३ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून,तर १५ डिसेंबर रोजी अर्ज छाननी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बी.एम.राऊत यांनी दिली आहे.
संपूर्ण आष्टी तालुका कार्यक्षेत्र असलेल्या विवेकानंद शिक्षकांची सहकारी पतसंस्था मर्यादित या आर्थिक संस्थेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून,अर्ज भरण्यास दि.८ डिसेंबर पासून सुरूवात झाली होती.आज गुरूवार दि.१४ रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने या पतसंस्थेच्या १७ जागेसाठी ११३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.मात्र तरीही निवडणूक होणार की बिनविरोध होण्यासाठी आमदार सुरेश धस स्वत;लक्ष घालून प्रयत्न करतात की काय?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आज दि.१४ डिसेंबर ही शेवटची मुदत होती.या निवडणूकीत एकून १७ जागेसाठी ११३ अर्ज दाखल झाले आहेत.तर दि.१५ डिसेंबरला छाननी,तर १८ डिसेंबर पासून १ जानेवारी २०२४ पर्यंत अर्ज मागे घेण्यासाठी शेवटची तारीख आहे.त्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे.तर मतदान दि.१४ जानेवारी २०२४ रोजी आष्टी व कडा या दोन केंद्रावर होऊन,त्याच दिवशी मतमोजणी व निकाल जाहीर केला जाईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी बी.एम.राऊत यांनी नमूद केले.या पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक होणार,हे माञ नववर्षाचे म्हणजे १ जानेवारीलाच स्पष्ट होईल.
असे दाखल झाले अर्ज
सर्वसधारणसाठी -78
भटक्या जाती जमाती -13
महिला राखीव -6
अनुसूचित जाती जमाती -5
इतर मागासवर्गीय -10
असे अर्ज आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.