व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आजी-माजी आमदारांची तहसिल कार्यालयात खडाजंगी; प्रश्न मांडा अधिका-यांना शिवीगाळ करू नका-आ.आजबे अधिका-यांची पाठराखण करू नका-माजी आ.दरेकर

आष्टी तहसिल कार्यालयात आढावा बैठकीतील प्रकार

0

click2ashti update-आष्टी तालुक्यातील हरामखोर कर्मचारी कार्यालयात हजर राहत नाही,याला आळा लोकप्रतिनिधी या नात्याने आमदारांची जबाबदारी असून तुम्हीच गैरहजर व कामचुकार अधिका-यांची पाठराखण करतात आसा पारा माजी आ.साहेबराव दरेकर यांनी चढविताच,मी कुणाचं ऐकूण घेयला मोकळा नाही,तुमचे जे प्रश्न आहेत ते मांडा,अधिका-यांना शिवीगाळ करू नका असे सुनावत आमदार आजबेंनी मी अधिका-यांची बाजू घेत नाही तर परिस्थितीची माहिती असल्याने जबाबदारीने बोलत असल्याचे त्यांनी सांगीतले.
आष्टी तालुक्याचा मुख्य ध्वजारोहण तहसिल कार्यालयात तहसिलदार बाळदत्त मोरे यांच्याहस्ते शुक्रवारी सकाळी ९.१५ वा.करण्यात आला.यानंतर तहसिल कार्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यालयाचे प्रमुख अधिकारांची बैठक आ.बाळासाहेब आजबे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.या बैठकीसाठी माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर,पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस,वाल्मिक निकाळजे यांच्यासह सर्व,व्यापारी,पञकार, वकील,डाॅक्टर व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीच्या सुरूवातीला या मुख्य शासकीय ध्वजारोहणासाठी ब-याच मुख्य कार्यालयीन प्रमुख गैरहजर राहिल्याने माजी आ.साहेबराव दरेकर यांनी आपला पारा चढवत हे हारामखोर अधिकारी काम करत नाहीत,मुख्यालायी थांबत नाहीत,पंचायत समिती,कृषी विभाग,तलाठी हे काम करत नसल्याच्या आरोप करत या कामचुकार अधिका-यांना लोकप्रतिनिधी या नात्याने तूम्ही लक्ष देण्याची गरज असतांना आमदार साहेबच या कामचुकार कर्मचा-यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप करताच आमदार बाळासाहेब आजबे यांनीही मी कुणाचेही ऐकूण घेयला मोकळा नाही,माझे प्रत्येक कार्यालयात लक्ष आहे.परंतु ब-याच कार्यालयात कर्मचा-यांची पदे रिक्त असल्याने नागरिकांच्या कामाला विलंब लागतो.पण या कर्तव्यावर असलेल्या अधिका-यांना शिवीगाळ करणे कितपत योग्य असल्याचे म्हणत आपण अधिका-यांची बाजू घेत नाही तर सर्व परिस्थिती माहिती असल्याने जबाबदारीने बोलत असल्याचे आ.आजबे यांनी माजी आ.दरेकर यांना सुनावले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.