कार्यकर्त्याने जोमाने कामाला लागून भाजपाने दहा वर्षात केलेले काम सर्वसामान्यां पर्यंत पोहचावे-आ.सुरेश धस
आष्टीत भाजपाची कार्यशाळा संपन्न
click2ashti update-गेल्या 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपा (BJP)सरकारने गरीब कल्याण,महिला सक्षमीकरण, अंतर्गत सुरक्षा, सांस्कृतिक उन्नती आणि जगामध्ये भारताचा गौरव वाढविण्यासह विकासाच्या सर्व आयामांवर अतुलनीय कार्य केले आहे.2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची विकासाची दृष्टी गरीबांच्या कल्याणाकडे घेऊन आणि सरकारने केलेली विकासकामे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या निर्देशानुसार “गाव चलो अभियान” सुरू करण्यात आले असून,कार्यकर्त्याने जोमाने कामाला लागून भाजपाने दहा वर्षात केलेले काम सर्वसामान्यां पर्यंत पोहचावे असे अवाहन आमदार सुरेश धस यांनी केले.
आष्टी येथील आमदार यांच्या निवासस्थानी दि.८ रोजी सकाळी ११ वा.भाजपाचे गाव चलो अभियान च्या अनुषांगाने प्रमुख कार्यकर्त्यांच्या आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना आ.धस बोलत होते.यावेळी लोकसभा विस्तारक आबासाहेब आगे, विस्तारक हरिषजी खाडे, विधानसभा संयोजक गणेश शिंदे,मंडळ संयोजक अमर निंबाळकर,अनिल ढोबळे,सोशल मीडिया टीम,आष्टी मंडळातील सर्व सुपर वॉरीअर्स,शक्ती केंद्र प्रमुख,बुथ प्रमुख,प्रवाशी कार्यकर्ता,गण प्रमुख,बुथ समिती पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी पुढे बोलतांना आ.धस म्हणाले,2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची विकासाची दृष्टी गरीबांच्या कल्याणाकडे घेऊन आणि सरकारने केलेली विकासकामे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या निर्देशानुसार “गाव चलो अभियान” सुरू करण्यात आले आहे. या अभियानातंर्गत देशभरातील 7 लाख बूथवर कार्यकर्ते 24 तास कार्यरत राहणार आहेत.या अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बळ देण्यासाठी(BJP) येत्या 4 ते 11 फेब्रुवारीदरम्यान आष्टी शहरामध्ये “गाव चलो अभियान” बूथ पातळीवर सुरुवात करण्यात आली असून,त्याचबरोबर 8 फेब्रुवारी रोजी विधानसभा-231 मध्ये निहाय कार्यशाळा आयोजित करून अभियानाबाबत नियोजन करण्यात आले असल्याचे आ.धस यांनी सांगीतले.सर्वोच्च नेतृत्वाच्या सूचनेनुसार 4 ते 11 फेब्रुवारीदरम्यान गाव चलो अभियान सुरू करण्यात आले आहे.या अभियानादरम्यान भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते 24 तास बूथ स्तरावरील बैठकीपासून ते घरोघरी जाऊन लोकांशी संवाद साधतील.त्याद्वारे सरकारच्या योजनांची माहिती देखील नागरिकांना देतील.त्यानुसार,प्रत्येकाने जबाबदारी पार पाडावी असेही आ.धस म्हणाले.