आज आष्टीत शिवजन्मोत्सवानिमित ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदूरीकर यांचे किर्तन
पंचक्रोशातील नागरीकांनी लाभ घ्यावा शिवजंयती समितीचे आवाहन
click2ashti update-छञपती शिवाजी महाराज यांच्या जंयती निमित्ताने प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्याकीर्तन सोहळ्याने आष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आज शनिवार दि.१७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.तरी पंचक्रोशातील भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती महोत्सव समिती च्या वतीने करण्यात आले आहे.
आष्टी येथील दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विविध सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात येणार आहे.यावर्षी संयोजन समितीने खास आकर्षण म्हणून ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर येणार असून,शनिवार दि.१७ रोजी सांयकाळी ५ वा.आष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात आले आहे.संयोजक समिती कडून या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.या किर्तन सोहळ्यासाठी शिवप्रेमी तसेच भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.