दुस-या लग्नाला विरोध केल्याने विवाहीतेवर चाकूने हल्ला;आष्टी पोलिसांत तीन जणांविरोधात गुन्हा दाखल
आष्टी तालुक्यातील चिखली येथील घटना
click2ashti update-दुस-या लग्नाला विरोध करणा-या विवाहीतेवर पती,दिर व सासूने मारहाण करूत चाकूने हल्ला केल्याची घटना आष्टी तालुक्यातील चिखली या गावात घडली असून,आष्टी पोलिसांत विवाहितेच्या फिर्यादीवरून पती,दिर अन् सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी आष्टी तालुक्यातील चिखली येथील विशाल जिजाबा भोसले याला दुसरे लग्न करायचे असल्याने त्याने पहिल्या पत्नीला मला फराकत दे असे सांगितले.परंतु पहिल्या पत्नीने या लग्नाला विरोध करत फराकत देण्यास नकार दिल्याने तिला पती,दिर व सासू यांनी शिवीगाळ,मारहाण करत चाकू हल्ला केल्याची घटना शुक्रवार दि.१६ रोजी घडली.या प्रकरणी रेणूका विशाल भोसले (वय २१)हिच्या फिर्यादीवरून विशाल जिजाबा भोसले (पती),नितीन जिजाबा भोसले (दिर)आणि गोकूळाबाई जिजाबा भोसले (सासू) यांच्या विरोधात आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपार पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलिस करत आहेत.