व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

अचारसंहितेचा कोणीही भंग करू नये,काटेकोरपणे पालन करा-तहसिलदार विनोद गुंड्डमवार

0

आष्टी-ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक आचारसंहितेचे कोणीही भंग न करता त्याचे काटेकोर पालन करावेत असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार विनोद गुंड्डमवार यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने माहे नोव्हेंबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या अशा सुमारे १०९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी पूर्व तयारीबाबत निर्गमित आदेशात आचारसंहिता लागू क्षेत्रामध्ये आचारसंहितेबाबत निर्देश दिले आहेत.संपणाऱ्या तसेच राज्य निवडणूक आयोगाने माहे नोव्हेंबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत ग्रामपंचायती नव्याने स्थापित ग्रामपंचायती तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे वगळलेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी संगणकप्रणालीद्वारे राबवण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.यात आष्टी १०९ ग्रामपंचायतीचे निवडणुकांचा कार्यक्रम जाहिर करण्यात आलेला आहे.राज्य निवडणूक आयोगाचे आचारसंहितेबाबचे दि.७ नोव्हेंबर २०२२ रोजीचे आदेशामधील निर्देशानुसार काटेकोरपणे पालन होईल यासाठी आवश्यक ती दक्षता घ्यावी व आचारसंहितेचा भंग होणार नाही याबाबत आवश्यक ती दक्षता घ्यावी.असे तहसिलदार विनोद गुंड्डमवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.