व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

न्यू आष्टी-अहमद नगर रेल्वेची दिवसातून दोनदा होणार फेरी

गुरूवार पासून सकाळी ११ व सांयकाळी ७ वा.जाणार आष्टीतून नगरला रेल्वे

0

आष्टी-गेल्या तीन वर्षापासून प्रतिक्षेत असलेली अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे अहमदनगर-न्यू आष्टी प्रवासी रेल्वे वाहतूक चे नुकतेच केंद्रीय रेल्वेराज्यमंञी खा.रावसाहेब दानवे,उपमुख्यमंञी देवेंद्र फडवीस,पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला होता.सुरूवातीला ही अहमदनगर-न्यू आष्टी अशी एकच फेरी होती.आता पुन्हा एक फेरी वाढवून सकाळी अन् संध्याकाळी दोन फे-या गुरूवार दि.१७ पासून होणार आहे.त्यामुळे अहमदनगरहून मुंबई-पुणे जाण्यासाठी आष्टी,जामखेड करांची सोय होणार आहे.
गेल्या तीस वर्षापासून स्व.केशरकाकू क्षीरसागर, स्व.गोपीनाथ मुंडे यांनी अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाची मुहूर्तमेढ रवली स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या सततच्या पारपुवठ्यामुळे या रेल्वे मार्गाने कामाची गती घेतली.पण बीड पर्यंत रेल्वे सुरू होईल असे वाटत होते.पण 30 वर्षात फक्त आष्टी पर्यंतचे काम पुर्ण होऊन अहमदनगर-बीड-परळी या रेल्वे मार्गाचे अर्धवट उद्याटन म्हणजे अहमदनगर-आष्टी या 65 कि.मी.चाच मार्ग पुर्ण होऊन दि.23 संप्टेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला होता.सुरूवातीपासून रेल्वे प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेनुसार म्हणजे सोमवार ते शनिवार अहमदनगर येथून सकाळी ७.४५ वा.निघून,नारायणडोह, न्यू लोणी,सोलापूरवाडी,न्यू धानोरा,कडा मार्गी आष्टी येथे सकाळी १०.३० वा.पोहचते तर न्यू आष्टी येथून ११ वा.निघून १.५५ वा.अहमदनगर येथे पोहचते तर आता पुन्हा अमहमदगर हून दुपारी ३.४० मिनिटाने निघून हि रेल्वे आष्टी येथे सांयकाळी ६.३० वा.पोहचून पुन्हा आष्टी येथून सांयकाळी ७ वा.निघून अहमदनगर येथे राञी ९.४५ वा.पोहचणार आहे.हि रेल्वे सेवा सोमवार ते शनिवार अशी सुरू राहून दर रविवारी सुट्टी राहणार आहे.तर न्यू आष्टी-अहमनगर च्या दोन फे-या दि.१७ नोव्हेंबर २०२२ गुरूवार पासून सुरू होणार आसल्याचे रेल्वे विभागाने जाहिर केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.