अहमदनगर-न्यू आष्टी दुसऱ्या डेमू सेवेचा उद्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांच्याहस्ते शुभारंभ
आष्टी-अहमदनगर-न्यू आष्टी आणखी एक नवीन डेमू (DEMU) रेल्वे सेवेला अहमदनगर रेल्वे स्टेशन स्थानकाहून उद्या दि. 17.11.2022 रोजी दुपारी 3.30 वा.केंद्रीय रेल्वे,कोळसा आणि खाण राज्यमंत्री,रावसाहेब दानवे भारत सरकार यांच्याहस्ते करण्यात येणार आहे.
अहमदनगर-न्यू आष्टी या (डेमू)रेल्वेची नियमित दुसरी फेरी दि.17 रोजी दुपारी ३.३० वा.होणार आहे.या रेल्वेने आष्टी व जामखेड तालुक्यातील नागरीकांना फायदा होणार आहे.या रेल्वेला हिरवी झेंडी केंद्रीय रेल्वेराज्यमंञी रावसाहेब दावणे यांच्याहस्ते दाखविण्यात येणार असून,या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती ना. राधाकृष्ण विखे पाटील महसूल,पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री,महाराष्ट्र सरकार,मा.खासदार डॉ. सुजय विखे पाटील,मा.खा.सदाशिव लोखंडे,मा.खासदार डॉ.प्रीतम मुंडे,मा.खा.श्रीमती रजनी पाटील,मा.आ.सुरेश धस,मा.आ.बाळासाहेब आजबे,आ.डॉ.सुधीर तांबे, मा.आ.प्रा.राम शिंदे,मा.आ.श्री.किशोर दारडे, मा.आ.बाळासाहेब थोरात,माजी आमदार बबनराव पाचपुते, मा.आ.रोहित पवार, मा.आ.संग्राम जगताप, मा.आ.प्राजक्त तनपुरे,मा.आ.निलेश लंके, मा.आ. शंकरराव गडाख,मा.आ.आशुतोष काळे,मा. आमदार डॉ.किरण लाहमटे,मा.आ.श्रीमती.मोनिका राजळे,मा.आ.लहू कानडे आणि श्रीमती रोहिणी शेंडगे,माननीय महापौर अहमदनगर,हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.या डेमू (DEMU) सेवा न्यू आष्टी-अहमदनगर पट्ट्यातील रहिवाशांना आणि जवळपासच्या भागातील रहिवाशांना उत्तम कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करेल.यामुळे स्थानिक व्यापार आणि उद्योगांना चालना मिळेल आणि त्यामुळे मराठवाडा क्षेत्राच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल.यामुळे विद्यार्थ्यांना स्थानिक कॉलेज तथा शाळांमध्ये येण्या- जाण्याचे सोयीस्कर होईल तसेच अन्य शहरांसाठी कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल.
अशी असेल दुस-या रेल्वे फेरीची वेळ
—————————————
गाडी क्रमांक 01403 अहमदनगर-न्यू आष्टी, अहमदनगर हून दुपारी 03.40 वा.ला सुटणार आणि नारायणडोहो आगमन 04.40 वा. प्रस्थान 04.42व्. लोणी आगमन 04.58 वा. प्रस्थान 05.00 वा. सोलापूरवाडी आगमन 05.25 प्रस्थान 05.27, न्यू धानोरा आगमन 05.43 प्रस्थान 05.45 वा.कडा आगमन 05.55 वा. प्रस्थान 05.57 वा.आणि न्यू आष्टी सायंकाळी 06.30 वा. ला पोहचेल.पुन्हा आष्टीवरून हिच गाडी क्रमांक 01404 न्यू आष्टी-अहमदनगर,न्यू आष्टीहून सायंकाळी 07.00 वा.ला सुटणार कडा आगमन 07.28 वा. प्रस्थान 07.30 वा.न्यू धानोरा आगमन 04.40 वा. प्रस्थान 07.42वा.सोलापूरवाडी आगमन 07.58 वा.प्रस्थान 08.00 वा.न्यू लोणी आगमन 08.25 वा.प्रस्थान 08.27,नारायणडोहो आगमन 08.53 वा.प्रस्थान 08.55.वा.अहमदनगरला रात्री 09.45 वा. ला पोहचेल अशी माहिती अहमदनगर रेल्वे प्रशासनाने दिली आहे.