व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

व-हाडी बनवुन आले अन् सव्वाचार लाखांचे नवरी चे दागिने लंपास केले

वरपिता साईनाथ बोडखे यांची पोलीसांत तक्रार

0

click2ashti update-आष्टी तालुक्यातील आनंदवाडी येथील मुख्याध्यापक साईनाथ बोडखे याचे चिरंजीव प्रदिप याचा खाकाळवाडी येथील दिपक नवले याची मुलगी निकीता हिच्याशी सोमवारी बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील एका मंगल कार्यालयात विवाह होता.सकाळी हळद आणि लग्न हे दोन्हीही विधी एकाच दिवशी असल्याने नवरदेवाच्या वडिलांनी नवरीसाठी मंगळसुत्र,मिनी गंठण,नथनी,कानातले झुंबके असे ४ लाख २५ हजार रु चे सोन्याचे दागिने आणले होते.हळदीचा कार्यक्रम सुरु होता.

त्यानंतर थोड्यावेळात लग्न लागणार असल्याने आवराआवर सुरू होती.नवरदेवाच्या नातेवाईक असलेल्या महिलेच्या पर्समध्ये हे दागिने होते.पण घाईगडबडीची संधी साधुन अज्ञात चोरट्यांनी या दागिन्यावर डल्ला मारल्याची घटना घडली.याप्रकरणी नवरदेवाचे वडिल पाटण सांगवी येथील सुदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक साईनाथ बोडखे यांनी आष्टी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरटय़ांविरुद्ध सोने चोरीची तक्रार दाखल केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.