व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टीच्या निष्क्रिय तहसीलदार प्रमोद गायकवाड यांची अखेर नागपूरला बदली

आष्टी येथे वैशाली नेमगोडा पाटील तहसिलदार म्हणून घेणार पदभार

0

click2ashti update-गेल्या दीड वर्षापासून आष्टी तहसीलदार म्हणून असलेल्या तहसीलदार पदावर प्रमोद गायकवाड हे रुजू झाले. परंतु तहसीलदार पदावर असून ते आष्टीकरनां “असून अडचण,नसून खोळंबा” या मनी प्रमाणे तालुक्याला जेरीस आणले होते. अखेर या निष्क्रिय तहसीलदार म्हणून असलेल्या प्रमोद गायकवाड यांची नागपूर येथे बदली झाली आहे. त्यामुळे आता तहसील मधले कामे पूर्ण होतील अशी अष्टीकरांना आहे.
गेल्या दीड वर्षांपूर्वी आष्टी तहसीलदार बीडहून रुजू झालेले तहसीलदार प्रमोद गायकवाड यांनी पदभार स्वीकारला.परंतु दीड वर्षाच्या काळात एक वर्षभर त्यांनी सुट्टीच घेऊन पदभार हाकला.कसलीच काम न करता साधी श्रावण बाळ,संजय निराधार या समितीची बैठकही घेतली नाही.तर संपूर्ण राज्यात महसूल पंधरवडा सुरू आहे.मात्र आष्टी मध्ये कसलाच कार्यक्रम त्यांनी घेतला नाही.काल डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे उपोषण तहसील कार्यालया समोर सुरू असताना तहसीलदार प्रमोद गायकवाड हे उपोषण सुरू झाल्यावर तहसील मधून निघून गेले.अशा निष्क्रिय तहसीलदाराची तात्काळ बदली करा अशी मागणी आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष यशवंत खंडागळे यांनी केली होती. आज शासनाने केलेल्या तहसीलदाराच्या बदलीत आष्टीचे निष्क्रिय तहसीलदार यांची नागपूर येथे बदली करण्यात आले आहे.त्यामुळे अष्टीकरांनी एक प्रकारे आनंदच व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.