व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

ग्रामपंचायतच्या निवडणुकीतच समजेल ‘किसमे कितना है दम !’

आ.धस व आ.आजबेंची प्रतिष्ठा पणाला

0

आष्टी-आष्टी-पाटोदा-शिरूर या तिन्ही तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूका जाहिर झाल्या असून,दि.२८ नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरू होणार आहे.मतदार संघात भाजप-राष्ट्रवादी लढत होणार हे माञ स्पष्ट असून,ग्रामपंचायत निवडणूक ही सर्वच पक्षातील नेत्यांसाठी प्रतिष्ठेची ठरणार असून,ग्रामपंचायतच्या निवडणूकीमागे आगामी विधानसभेची रंगीत तालीम म्हणूनच पाहिले जात आहे.
आष्टी तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहिर झाल्या असून,निवडणूक कार्यक्रमही लागला आहे.या तालुक्यातील २०१७ च्या ग्रामपंचायत निवडणूकीत जवळपास ७० ग्रामपंचायत आ.सुरेश धस यांच्या ताब्यात आहे.आता २०२२ मध्ये राष्ट्रवादी काॅग्रेसचे आमदार बाळासाहेब आजबे यांनाही ग्रामपंचायत निवडणूकीत आपली प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे.तालुक्यातील सहकार क्षेञात नेहमीच आ.सुरेश धस यांचे वर्चस्व राहिले आहे.यामध्ये आष्टी तालुका दुध उत्पादक संघ,सेवा सहकारी संस्था,कृषी उत्पन्न बाजार समिती,पंचायत समिती,नगर पंचायत संस्थेवरही आ.धस यांचे वर्चस्व आहे.आता सध्या होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपा आ.सुरेश धस व राष्ट्रवादी काॅग्रेसचे आ.बाळासाहेब आजबे यांच्यात सरळ-सरळ लढत होणार आहे.परंतु ही निवडणूक विधानसभेच्या निवडणूकीची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे.

आ.धस-आ.आजबे यांची प्रतिष्ठा पणाला..!
———————————————————
गेल्या काही दिवसापासून मतदार संघातील प्रमुख नेते असलेले आ.सुरेश धस व आ.बाळासाहेब आजबे यांच्यात राजकीय कलगीतुरा वाढला आहे.दोन्ही नेत्यांमधील वाद आता केवळ राजकीय आखाड्यापर्यंत राहिलेला नाही,तर हा वाद एकमेकांच्या कॉलरपर्यंत येऊन पोहोचला आहे.दोन्ही नेते एकमेकांवर पातळी सोडून टीका करत असून,आता याच दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा ग्रामपंचायतच्या निवडणुकीत लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.