खोट्या मंजूरीची टिमकी वाजवून मतदार संघातील जनतेची दिशाभूल आमदार आजबेंनी करू नये-माजीमंत्री सुरेश धस
आमदार सुरेश धस यांचा पत्रकार परिषदेत आरोप
click2ashti update-गेल्या चार दिवसांपासून मतदार संघाचे विकासाभिमुख नेतृत्व असलेल्या आमदारांनी,नुकतेच आष्टी,पाटोदा,शिरूर तालुक्यात नऊ 33/11 सबस्टेशन सह 638 विद्युत रोहित्राना मंजुरी मिळवली असल्याचे खोटी “टिमकी” वाजवत मतदार संघातील जनतेची निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन दिशाभूल करत आहेत.आमदार बाळासाहेब आजबे यांनी मतदार संघातील जनतेची माफी मागावी अशी मागणी माजीमंत्री सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
आष्टी येथील अव्दैतचंद्र निवासस्थानी आज सोमवार दि.5 रोजी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माजीमंत्री सुरेश धस बोलत होते.यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले, सध्या आष्टी,पाटोदा,शिरूर मतदारसंघाचे स्वतःला कर्तव्यदक्ष आमदार समजणा-या आ.बाळासाहेब आजबे यांचा गाव भेट दौरा सुरू असून,या भेट दौ-यात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असणारा पाणी आणि विजेचा प्रश्न प्रामुख्याने हाताळत तो कसा सोडविला ह्याची खुंटेफळ साठवण तलावाचा प्रश्न व मतदार संघात 33/11 चे नऊ सबस्टेशनसह 638 विद्युत रोहित्रांना मंजूरी मिळविल्याचे भाषणे ठोकीत आहेत.पण जे वरील कामांना अजून मंजूरीच मिळाली नाही.हे सर्व कामे केंद्र सरकारची असून,यासाठी मी स्वत;मा.कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कं.विभागीय कार्यालय बीड यांना दि.
११/०९/२०२३ आष्टी,पाटोदा आणि शिरूर का. तालुक्यातील सुधारित वितरण क्षेत्र योजना (RDSS) अंतर्गत कामांना मंजुरी मिळणे बाबत पत्र दिले होते.यापत्रात बीड जिल्ह्यातील आष्टी पाटोदा आणि शिरूर (का) तालुक्यात नवीन ३३/११ के.व्ही. वीज उपकेंद्र मंजुर करणे आवश्यक आहेत.यामध्ये आष्टी तालुक्यातील
१)दादेगाव २)पारोडी ३)बीड सांगवी ४)मातकुळी ५)कोयाळ ६) अंभोरा ७)जामगाव पाटोदा तालुक्यातील१) धनगर जवळका २)पारगाव घुमरा ३)सौताडा शिरूर कासार तालुक्यातील शिरूर का.शहरात एक
याचबरोबर सद्यस्थितीतील ५ एम.व्ही.ए.क्षमतेच्या पावर ट्रांसफार्मर सह आणखी एक,५ MVA पावर ट्रांसफार्मर बसवणे आवश्यक आहेत.तसेच आष्टी तालुक्यातील १) पोखरी २) शिराळ ३) धानोरा ४) दौलावडगाव ५) टाकळी अमिया पाटोदा तालुक्यातील १) रोहतवाडी २) कोतन ३) कुसळंब व आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्यासाठी नवीन ५ फीडरवे तयार करणे,१०० क्षमतेचे ५५८ नवीन ट्रांसफार्मर चा पुरवठा करणे,सद्यस्थितीतील १७५ ठिकाणी ६३ क्षमते ऐवजी १०० क्षमता असलेले ट्रांसफार्मर Executiबसवणे,११ के.व्ही. वीज वाहिनी ३१९ कि. मी. तयार करणे, ३३/११ सब स्टेशन साठी ३८ कि.मी.वीज वाहिनी तयार O & M.Dकरणेeed Ad.Ε.Ε.D.Ε.Ε.(0) याप्रमाणे आष्टी,पाटोदा आणि शिरूर का. तालुक्यातील शेतकरी वीज ग्राहकांसाठी पुरेशा दाबाने आणि AFI समाधानकारक वीजपुरवठा व्हावा यासाठी उपरोक्त प्रमाणे तात्काळ कार्यवाही व्हावी असे पत्र दिले होते.या पत्रावर महावितरण च्या मुख्य कार्यालय मुंबई,यांनी प्राप्त माहितीनुसार सुधारित वितरण क्षेत्र योजनेअंतर्गत येणाऱ्या आधुनिकीकरण व प्रणाली संवर्धन या भागात होणाऱ्या (नवीन उपकेंद्रे,क्षमता वाढ,अतिरिक्त उच्च दाब रोहित्र्ये) कामास अद्याप शासनाची मान्यता मिळालेली नाही.तसेच सुधारित वितरण क्षेत्र योजनेअंतर्गत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०,(विद्युत प्रणाली बळकटीकरण योजना फेज-1)अन्वये मुख्य कार्यालय मुंबई यांच्याकडून मराठवाड्यातील कामांसाठी निविदा (क्रमांक- CE/Projects/RDSS/MSKVY२.०/२४- २५/T-०२) काढण्यात आलेली आहे.असे असतांनाच या सध्याचे लोकप्रतिनिधी हे मतदार संघातील जनतेला खोटी माहिती देऊन दिशाभूल करत आहेत.त्यामुळे त्यांनी मतदार संघातील जनतेची माफी मागावी नसता मंजूर झालेल्या कामांसाठी पत्रव्यवहार केलेले पत्र दाखवावे असे आवाहन माजीमंत्री सुरेश धस यांनी आमदार बाळासाहेब आजबे यांना केले आहे.