व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

बीड शहरात पवित्र मस्जिद मध्ये घुसून हल्ला;दोन जण गंभीर जखमी

नागरिकांकडून निषेध !

0

click2ashti update-बीड शहरातील बुंदेलपुरा भागात असलेल्या मस्जिद मध्ये नमाज साठी जाणाऱ्या तिघांवर आठ ते दहा जणांनी काठ्या,कुऱ्हाडी,तलवार आणि चाकूने हल्ला केला.यामध्ये दोघांची प्रकृती गंभीर आहे.पवित्र मस्जिद मध्ये घुसून हल्ला करण्याच्या प्रकाराचा मुस्लिम समाजाने निषेध केला आहे. आरोपीना तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे.

बीड-शहरातील बुंदेलपुरा भागात असलेल्या मस्जिद मध्ये हल्ला झाल्यानंतर पोलिस ठाण्यात नागरिकांनी केलेली गर्दी दिसत आहे.

पेठ बीड भागातील महेबूब खान आणि जमील गुत्तेदार यांचे गेल्या अनेक दिवसापासून भांडण सुरु होते.महेबूब खान याच्या मुलाने मंगळवार (दि.६) दुपारी अडीच तीन वाजण्याच्या सुमारास जमील गुत्तेदार हा आपल्या भावासह नमाज साठी मस्जिद मध्ये जातं होता त्याच्यावर हल्ला केला.नमाज सुरु असताना हा प्रकार झाल्याने उपस्थित लोक तातडीने धावले,त्यानंतर आरोपी फरार झाले.या घटनेत जमील गुत्तेदार व इतर दोघे गंभीर जखमी झाले.त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.दरम्यान पवित्र अशा मस्जिद मध्ये नमाज सुरु असताना घुसून तलवार,चाकू,लाठ्या,काठ्या चा वापर करून या पवित्र स्थळाला बदनाम करणाऱ्या आरोपीना तातडीने अटक करा अशी मागणी समाजातील नागरिकांनी पोलिसांकडे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.