आष्टीची “धनश्री” सलग सातव्यांदा राज्यस्तरीय दिपस्तभं पुरस्काराने सन्मानीत
पुरस्कार सोहळा हैद्राबाद येथेली रामोजी फिल्म सीटीमध्ये संपन्न
click2ashti update-आष्टी-बीड जिल्ह्यात नावलौकीक असलेली,आर्थिक शिस्तीबरोबर नेहमी सामाजिक कार्यात व वृक्ष लागवडीत अग्रेसर असलेली आष्टीच्या “धनश्री” पतसंस्थेला सलग सात व्या वर्षी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा “दिपस्तंभ पुरस्कार”फेडरेशनतर्फे मिळलेला आहे.हा पुरस्कार सोहळा दि.३ ऑगस्ट २०२४ रोजी हैद्राबाद येथील रामोजी फिल्म सीटीमध्ये संपन्न झाला.५० कोटी ठेवी मध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात प्रथम क्रमांकाचा पुरस्कर पतसंस्थेस राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे मुख्याधिकारी सुरेखा लवांडे,कॉसमॉस बँकेचे,अध्यक्ष मिलींद काळे यांच्यातर्फे देण्यात आला.
हा पुरस्कार संचालक स्वप्नील रंगनाथ धोंडे व पतसंस्थेचे मुख्याधिकारी जितेंद्र शिंदे यांनी स्वीकारला असून,पतसंस्थेस आतापर्यत अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.यामध्ये सर्वात मोठा महाराष्ट शासनाचा छत्रपती संभाजीनगर विभागातील “सहकारनिष्ठ” हा पुरस्कारदेखील मिळालेले आहे.राज्य पतसंस्था फेडरेशनचा “दिपस्तंभ” हा पुरस्कार आतापर्यंत ७ वेळा मिळालेला आहे.कोल्हापुर येथील अविज पब्लीकेशनचा “बँको पुरस्कार” देखील ४ वेळा मिळालेला आहे.हे सर्व पुरस्कार पतसंथेच्या सभासदाचा अतुट विश्वास व संस्था कर्मचारी यांच्या कष्टाचे फळ असल्याची भावना पतसंस्थेचे चेअरमन तथा आष्टीचे माजी नगराध्यक्ष वृक्षमित्र रंगनाथ धोंडे यांनी व्यक्त केली.