आष्टी तालुक्यात बीएसएनएल ची 5 जी सिम कार्ड वाटप सुरूवात
click2ashti update-सध्याच्या काळात मोबाईल रिचार्ज चे दर भरमसाठ वाढल्याने गोरगरिबांना मोबाईल वापरणे कठीण झाले आहे. मोबाईल वापर काळाची गरज असल्याने तो वापरावा लागतो आणि सर्व सामान्यांना त्याचे दर परवडले पाहिजे याची जाणीव म्हणून बीएसएनएलने माफक दरात रिचार्ज ठेवले असून,स्पर्धेच्या युगात 5जी सिम वाटप ची सुरुवात आज पासून आष्टी तालुक्यात करण्यात आली आहे.गोरगरिबांची ओळख असलेले बीएसएनएल सेवेचा लाभ घ्यावा आवाहन बीएसएनएल अधिकारी राहुल खेडकर यांनी केले.
आष्टी तालुक्यात आज दि.9 पासुन 5 जी सिम कार्ड वाटप सुरुवात शहरातील गुरुकृपा मोबाईल शाॅपीमध्ये ग्राहकांना 5 जी प्रायोगिक सिमकार्ड देऊन शुभारंभ करण्यात आला.यावेळी भारत संचार निगम लिमिटेड चे अधिकारी खेडकर बोलत होते.यावेळी महाराष्ट्र सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे,उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुध्दे,आष्टी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण पोकळे,गणेश दळवी,सचिन रानडे,ग्रामपंचायत सदस्य अक्षय हळपावत,सुनिल नरवडे,विक्रेते प्रितम बोगावत,समिर पोकळे आदि उपस्थित होते.