व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळणारा दुध भेसळीतला एक आरोपी अजूनही फरार;आरोपी शोधण्यासाठी पथक रवाना

दुधभेसळांवर कठोर कारवाई करा: माजीमंत्री धस आक्रमक

0

click2ashti update-पैसे कमविण्यासाठी कोण कसा व्यवसाय करून आपले उखळ पांढरे करण्यासाठी नामी शक्कल लढवितात.असाच प्रकार आष्टी तालुक्यात पुन्हा एकदा सुरू झाल्याने,पाढं-या दुधावरच्या,काळ्या बोक्यांनी पुन्हा डोकेवर काढले आहे.चार दिवसापूर्वीच कडा व टाकळी येथील दुध संकलन केंद्रावर स्वत:जिल्हाधिकारी यांनी छापा टाकुनी,दुधात मिसळणारी जवळपास २० लाख रुपायांची पावडर व इतर साहित्य जप्त करुन एक आरोपीला अटक केली तर दुसरा आरोपी अजूनही फरार असून,त्या आरोपीला पकडण्यासाठी पथक रवाना केले असल्याची माहिती प्रभारी पोलिस निरीक्षक विक्रांत हिंगे यांनी दिली आहे.शिवाय या दूध भेसळ प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी माजी मंत्री सुरेश धस यांनी केली आहे.मात्र तालुक्यातील इतर लोकप्रतिनिधी या प्रकरणी भ्र शब्द काढायला तयार नाहीत.माजीमंत्री धस यांनी तर दुध भेसळांवर कडक कारवाई ची मागणी केली आहे.
जिल्ह्यात दुध संकलनात अग्रेसर आसणा-या आष्टी तालुक्यात दुधात भेसळ करण्याचा प्रकार पुन्हा सुरू झाल्याने,दुधाच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे समोर आले आहे.मध्यंतरी भेसळ माफियांवर कारवाई झाल्यानंतर दुधातील भेसळ करण्याचे प्रमाण कमी झाले होते.माञ अन्न भेसळ खात्याच्या सपशेल दुर्लक्षामुळे दुध भेसळ माफियांनी पुन्हा आपले दुकान थाटले आहे. कृञिम दुधात कॉष्टीक सोडा,युरिया,पामतेल, अँसिड असे शरिराला घातक द्रव्य दुधात मिक्स करून कञिम दुध तयार करतात.त्यामुळे नागरिकांच्या जिवाशी खेळणारा हा आघोरी उद्योग सध्या झपाट्याने वाढत आहे.ज्यांच्याकडे गायाच नाहीत,ते देखील दुधवाले बनले आहेत.त्यामुळे गाया नस-यांकडे दुध नेमकं आलं कुठून अशी चर्चा सर्वञ ऐकावयास मिळत आहे.मागील काही वर्षापासून बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील टाकळी अमिया फाट्याजवळ असलेल्या एका गोडाऊन मध्ये भेसळयुक्त दुधाची गुणवत्ता वाढवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध कंपनीच्या पावडरचा साठा अन्न प्रशासन व आष्टी पोलिसांनी धाड टाकुन जप्त केल्याची कारवाई रविवार दि ४ रोजी पहाटे करण्यात आली.असून आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथील अंबादास पांडुरंग चौधरी याचे कडा येथील टाकळी अमिया रोडलगत साईदत्त एंटरप्राययजेस नावाने दुकान व लगत पत्र्याच्या शेडमध्ये गोडाऊन आहे.गोपनिय माहितीच्या आधारे अन्न व पोलीस प्रशासनाने रविवारी पहाटे या ठिकाणी धाड टाकली. गोडाऊनची पाहणी केली असता भेसळयुक्त दुधाची गुणवत्ता वाढवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पावडरचा मोठा साठा आढळून आला.या कारवाईने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. तर टाकळी अमिया येथे रामदास चौधरी याच्या दुध प्रकिया सेंटर वर देखील ही पावडर आढळून आल्याने ते सेंटर सील करण्यात आले आहे.ही कारवाई जिल्हाधिकारी अविनाश पाठक व अन्न भेसळ च्या अधिकारी यांनी केली होती.
छापा टाकला पण पुढे काय?
अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी भेसळ होत असल्याच्या संशयावरून एखाद्या दुकानावर,दुध संघावर छापा टाकतात.मात्र,एक छापा टाकला तरी त्याच्या तपासणीचे नमुने लवकर प्राप्त होत नाहीत,त्या कारवाईचे पुढे काय होते,हे नागरिकांना समजत नाही. मात्र,अशी कारवाई झाली की संबंधीत भेसळीवाले साहेबांचे हात ओले करतात,त्यानंतर कारवाईला विश्रांती मिळते,फार्स नको तर प्रत्यक्षात कठोर कारवाई करावी,अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून केली जात आहे.
दुध च नाही तर किराणा दुकानांवरही छापे मारा
आष्टी तालुक्यात काही छोट्या व्यापारी वर्गाबरोबर तेल आणि दूध विक्रीत काही बडे व्यापारी गुंतले आहेत.या साखळीत अगदी हुबेहूब दिसणारे तेल आणि दूध बनविण्यासाठी हानिकारक केमिकल्सचा वापर होत असल्याची चर्चा आहे.त्यामुळे प्रामुख्याने तेल आणि दूधाचे तालुक्यातील विविध ठिकाणचे नमुने तपासण्याची गरज आहे.
आरोपीला दहा दिवसांची पोलिस कोठडी
दरम्यान या कारवाईत अंबादास पांडुरंग चौधरी याला अटक करण्यात आली असुन,आगोदर न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती.परंतु पोलिसांनी अजून माहिती मिळावी म्हणून पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि.१८ ऑगस्ट पर्यंत म्हणजे दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
विक्रांत हिंगे,प्रभारी पोलिस निरीक्षक आष्टी

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.