व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

तालुक्यातील १०९ ग्रा.पं.निवडणुकीची नोटीस प्रसिध्द

गावागावांत ग्रा.पं.च्या निवडणुकांचे वारे;नेत्यांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू

0

आष्टी-ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची नोटीस तहसीलदारांनी १८ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली असून,उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया येत्या २८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.या पार्श्वभूमीवर निवडणुका होत असलेल्या जिल्ह्यातील गावागावांमध्ये ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असून,गावपुढाऱ्यांच्या बैठकांचे सत्र आणि इच्छुक उमेदवारांकडून निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे.
तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदांच्या निवडणुकांसाठी येत्या १८ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील संबंधित १०९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची नोटीस तहसीलदार विनोद गुंड्डमवार यांच्याकडून १८ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली.उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया २८ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून,अर्ज दाखल करण्याची मुदत २ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे.

नेत्यांकडून उमेदवारांची चाचपणी
गाव पुढाऱ्यांकडून घेण्यात येत असलेल्या बैठकांमध्ये सरपंचपदासह ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी उमेदवारांची चाचपणी केली जात आहे.तसेच निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांनीही निवडणुकीची तयारी सुरु केली असून,नेत्यांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.

कागदपत्रांची जुळवाजुळव
उमेदवारी अर्जासोबत सादर करावयाच्या आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी इच्छुकांची धावपळ सुरु झाली आहे.संबंधित तहसील कार्यालय,पंचायत समिती आदी संबंधित कार्यालयांमध्ये वर्दळ वाढल्याचे चित्र आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.