व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

ग्रामपंचायत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या कागदपञांची करावी लागणार पुर्तता-तहसिलदार

सोमवार पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात

0

आष्टी-ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला असून,उमेदवारी अर्ज सोमवार दि.२८ पासून आॅनलाईन भरण्यास सुरूवात होणार आहे.उमेदवारी अर्ज भरतांना उमेदवारांनी योग्य ती काळजी घेऊन आॅनलाईन अर्ज दाखल करून त्या अर्जाची प्रिंट काढून,तहसिल कार्यालयात जमा करावी असे अहवान तहसिलदार विनोद गुंड्डमवार यांनी केले आहे.
ग्रामपंचायत निवडणूक-२०२२ कार्यक्रम जाहिर झाला असून,उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार भारताचा नागरिक असावा,ग्रामपंच्यातचा कंत्राटदार नसावा,उमेदवाराचे नाव ग्रामपंचायतच्या मतदार यादीमध्ये नाव असायला हवे,उमेदवाराचे वय २१ वर्ष पूर्ण असावे,सरकारी कर्मचारी निवडणुक लढवु शकत नाही,दोन पेक्षा जास्त मुलं असु नये तसेच सरपंच पदासाठी ज्या उमेदवाराची जन्म तारीख १९९५ नंतर ची असेल त्या उमेदवारांचे किमान सातवी पास असणे आवश्यक आहे.तसेच उमेदवारांने आॅनलाईन अर्ज भरून त्या अर्जाची प्रिंट काढून आष्टी येथील शासकीय आयटीआय महाविद्यालयात दाखल करावा असे अहवान तहसिलदार गुंड्डमवार यांनी केले आहे.

सरपंच ग्रामपंचायत उमेदवारी अर्ज सोबत सादर कारवाईची कागद पत्रे
१) निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समोरील शपत पत्र २)निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समोरील घोषणा पत्र ३)ओळखपत्र–आधारकार्ड,पॅनकार्ड,आणि मतदान कार्ड इत्यादी.४) ग्रामपंचातकडून थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.५) राखीव जागेसाठी आरक्षण असेल तर जातीचे प्रमाण पत्र.६)आरक्षित असेल तर जात वैधता प्रमाण पत्र किंवा पोच पावतीची झेरॉक्स.७)रहिवासी दाखला ८) उमेदवार इतर वार्डमधून उमेदवारी अर्ज भरत असेल तर मतदार यादी जोडा. ९)वयाचा दाखला १०) घरी शौचालय असल्याचा दाखला या कागदपञांची पुर्तता करावी लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.