व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

पहिल्या दिवशी सदस्यपदासाठी एक अर्ज दाखल.. आष्टी तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतचीं रणधुमाळी सुरू

0

आष्टी-तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींचा रणसंग्राम सुरु झाला आहे.आज,सोमवारी(दि.२८)नोव्हेंबरपासून या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली.दरम्यान पहिल्याच दिवशी सदस्यांसाठी एक अर्ज दाखल झाला असल्याची माहिती तहसिलदार विनोद गुंड्डमवार यांनी दिली.
तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे.सरपंचांची निवड थेट जनतेमधून करावयाची असल्याने यावेळच्या निवडणुकीत अधिक चुरस निर्माण झाली आहे.आज,सोमवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी तालुक्यातील मांडवा ग्रामपंचायत मधील सदस्यपदासाठी श्रीधर मुटकूळे यांनी अर्ज दाखल केला आहे.सदर निवडणुकीमुळे तालुक्यातील प्रत्येक गावातील राजकीय वातावरण तापले असून सरपंचाची निवडणूक थेट होत असल्याने राजकीय पक्षही या निवडणुकीसाठी अप्रत्यक्षपणे पुढे आले आहेत.सदर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा गेल्या २ नोव्हेंबर रोजी करण्यात आली होती.त्याच दिवसापासून या सर्व गावांमध्ये आचारसंहिता लागू झाली.त्यानंतर आज, 28 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम
उमेदवारी दाखल करणे २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर
उमेदवारी अर्जांची छाननी ५ डिसेंबर,उमेदवारी मागे घेणे
७ डिसेंबर मतदान १८ डिसेंबर,मतमोजणी २० डिसेंबर असा निवडणूक कार्यक्रम आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.