देवस्थान इनामी जमिनी माझ्या व कुटुंबाच्या नावावर नाहीत राजकीय षडयंत्र असल्याचा धसांचा आरोप
आष्टी-तालुक्यातील देवस्थान इनामी जमीन प्रकरणी नुकताच आमदार सुरेश धस याच्यासह पत्नी व भाऊ याच्यावर आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.या देवस्थान इनामी जमीन प्रकरणी माझा व माझ्या कुटुंबाच्या नावावर नसुन हे षडयंत्र असल्याचा आरोप असून,आपल्यावर झालेल्या गुन्ह्यांत पोलिसांना सहकार्य करणार असल्याचे आमदार सुरेश धस यांनी येथे सांगितले.
आष्टी येथील आठ देवस्थान इनाम जमीन घोटाळ्या प्रकरणी बुधवारी आमदार सुरेश धस यांच्यासह पत्नी व भाऊ यांच्यावर गुन्हा नोंद झाला होता.हा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुरूवारी दि.१ रोजी त्यानी आष्टी येथील निवासस्थानी पत्रकार परिषेद घेतली.पुढे बोलतांना आ.धस म्हणाले की,देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणातील जमीनी माझ्या व माझ्या कुटुंबाच्या नावावर नाहीत,निराधार तक्रारातील वाक्य रचनेमुळे गुन्हे दाखल झाले आहेत.मी जुन्या पक्षात काम करत असताना राज्य व जिल्हास्तरावरील लोकांचे हे राजकीय षडयंत्र असुन पोलिसांच्या चौकशीला मी तयार असुन त्याना सहकार्य करणार आहे.लवकरच दुध का दुध व पाणी का पाणी होणार आहे.लोकसेवका विरोधात तक्रार आली तर त्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी आवश्यक असते.पण तशी परवानगी अद्याप घेतली गेली नाही. जर अस घडत असेल तर कोणत्याही लोकसेवकावर असे अस्त्र वापरले जाईल असेही त्यांनी सांगीतले.