स्वातंत्र्य सैनिक सर्जेराव काकडे पाटील यांच्यावर शासकीय इतमामात किन्ही येथे अंत्यसंस्कार
click2ashti update-आष्टी तालुक्यातील ज्येष्ठ स्वतंत्र सैनिक तथा किन्हीचे माजी पोलीस पाटील सर्जेराव साहेबराव काकडे (वय९७) यांच्यावर गुरुवार (दि.12) रोजी सकाळी 9 वा. किन्ही येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी बोलताना माजी आ.साहेबराव दरेकर म्हणाले की,सर्जेराव पाटील धाडसी व्यक्तिमत्व होते.स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी भाग घेऊन देशासाठी मोठे योगदान दिलेले आहे.माझे आणि त्यांचे निकटचे संबंध होते.जुन्या काळातील खरे बोलणारी पिढी होती.आज त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.मात्र आलेला मनुष्य देह हा जाणारच त्यामुळे पाटील दादांचे विचार आपण अंगीकारले पाहिजे. तालुकाभरातून त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी अनेक प्रतिष्ठित उपस्थित होते.शरद काकडे व डॉ.आप्पासाहेब काकडे यांनी स्वातंत्र्य सैनिक काकडे पाटील यांच्या चितेला अग्नी दिला.राजेंद्र धोंडे,नरसिंह जाधव यशभैय्या आजबे,अमोल तरटे,राम खाडे,डाॕ.विलासराव सोनवणे, शिवाजी नाकाडे,आण्णासाहेब चौधरी,सतीष शिंदे,जयदत्त धस,माजी आ.साहेबराव दरेकर,ह.भ.प.महादेव कोल्हे महाराज यांनी श्रध्दांजली अर्पण केली.यावेळी नवनाथ पठाडे,पत्रकार उत्तम बोडखे, सतीषमामा जांगले मामा,माजी सरपंच बन्शीभाऊ पोकळे,आदिनाथ पोकळे,हरिचंद्र बोडखे,बद्रीनाथ आजबे,महसुल विभागाचे प्रतिनिधी म्हणून निर्मल चव्हाण,सामाजिक,राजकीय,धार्मिक,महसुल पोलीस क्षेत्रातील मान्यवर,ग्रामस्थ,नातेवाईक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांच्या पश्चात पत्नी,मुले,मुली,जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे.