व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

ग्रामपंचायत निवडणूक अर्ज आता स्वीकारणार आॅफलाईन

आमदार सुरेश धस यांच्या पञाने निवडणूक विभागाने घेतला निर्णय

0

आष्टी-तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू झाली परंतु निवडणूक अर्ज आॅनलाईन होत नसल्याने नवनिर्वाचित उमेदवार तासन तास नेट कॅफेच्या दारात बसून होते.आज निवडणूक विभागाला आमदार सुरेश धस यांनी पञ देऊन ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारी अर्ज आॅफलाईन स्विकारावा अशी विनंती करताच आता ग्रामपंचायत निवडणूकीचा अर्ज आॅफलाईन सादर करावा असे अहवान तहसिलदार विनोद गुंड्डमवार यांनी केले आहे.
तालुक्यातील १०५ ग्रामपंचायत निवडणूकीत नामनिर्देशन फाॅर्म भरण्याची प्रक्रीया दि.२८ नोंव्हेंबर पासून सुरू झाली.परंतु आॅनलाईन सर्व्हेर डाऊन असल्यामुळे उमेदवार व प्रशासनालाही डोकेदुखी होत होती.याबाबत आमदार सुरेश धस यांनी निवडणूक आयोगाला पञ देऊन हे उमेदवारी अर्ज आॅफलाईन स्वीकारावा अशी मागणी केली होती.निवडणूक आयोगाने तात्काळ निर्णय घेत ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारी अर्ज आॅफलाईन स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत.आष्टी तालुक्यातील उमेदवारांनी आॅफलाईन उमेदवारी अर्ज दाखल करावा असे अहवान तहसिलदार विनोद गुंड्डमवार यांनी केले आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वेळ वाढविला-दळवी
ग्रामपंचायत उमेदवारी अर्ज उद्या दि.२ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वा.पर्यंत वेळ होती.परंतु ही वेळ अडीच तासांनी वाढवून दुपारी ५.३०पर्यंत वेळ वाढविला असल्याची माहिती निवडणूक नायब तहसिलदार शारदा दळवी यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.