व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

श्री अमोलक ऋषींच्या पुण्यतीथी निमित्त १०३ जणांनी केले रक्तदान

0

click2ashti update-कडा येथील अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक अमोलक ऋषी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 103 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
आष्टी तालुक्यातील कडा येथील शतकपूर्तीकडे वाटचाल करत असलेल्या श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या शिक्षण संस्थेत अमोलक ऋषींच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले त्यामध्ये शालेय वकृत्व स्पर्धा,अहिंसा रत्न पुरस्कार,संस्कृतीक, धार्मिक कार्यक्रमासह रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .या रक्तदान शिबिराला उस्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.यावेळी प्राणिमित्र नितीन आळकुटे यांना अहिंसा रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यावेळी म.सा.विश्वादर्शनाजी,किर्तीसुधाजी म.सा.उपस्थित होत्या.तसेच संस्थेचे अध्यक्ष योगेश भंडारी,सचिव हेमंत पोखरणा,कांतीलाल चानोदिया,डॉ.उमेश गांधी,यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.