व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टी तालुक्यातील ग्रामपंचायत ९२१ सदस्यांसाठी २ हजार ८३६ तर १०९ सरपंच ६३० अर्ज दाखल

राञी उशीरा पर्यंत अर्ज स्वीकारणे सुरूच

0

आष्टी-तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची झुंबड उडाली होती.सकाळपासूनच उमेदवारांनी गर्दी केल्याने राञी उशीरापर्यंत अर्ज स्वीकारण्याचे काम सुरू होते.शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी ४३९ तर सदस्यपदासाठी १९५७ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती तहसिलदार विनोद गुंड्डमवार यांनी दिली.
आष्टी तालुक्यातील १०९ ग्रामपंचायत निवडणूकीत ९२१ सदस्यांसाठी शेवटच्या दिवशी १९५७ तर १०९ सरपंच पदासाठी ४३९ अर्ज दाखल झाले आहेत.राञी उशीरापर्यंत अर्ज स्वीकारण्याचे काम सुरू होते.तसेच दि.१/१२/२०२२ पर्यंत सरपंच पदासाठी १९१ तर सदस्यपदासाठी ८७९ अर्ज दाखल झाले होते.असे एकूण आष्टी तालुक्यातील ग्रामपंचायत ९२१ सदस्यांसाठी २ हजार ८३६ तर १०९ सरपंच ६३० अर्ज दाखल झाले असल्याची माहिती तहसिलदार विनोद गुंड्डमवार यांनी दिली.
ग्रामपांचायत निहाय उमेदवारांची यादी नावासह उद्या प्रकाशित करण्यात येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.